पोलीस वर्धापन सप्ताहातील प्रदर्शनीला उस्फूर्त प्रतिसाद ; 18 शाळा-महाविद्यालयांतील 2200 विद्यार्थ्यांचा सहभाग
वर्धा
:- २ जानेवारी पोलीस स्थापना दिनानिमित्त वर्धा पोलीस विभागाच्या वतीने आयोजित पोलीस वर्धापन सप्ताह अंतर्गत पोलीस मुख्यालय मैदान, वर्धा येथे भरविण्यात आलेल्या प्रदर्शनीला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आज मंगळवारी (दि. 7) 18 शाळा व महाविद्यालयांतील सुमारे 2200 विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीस भेट देत पोलीस कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती घेतली. यापूर्वी काल 17 शाळा-महाविद्यालयांतील 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
या प्रदर्शनीत पोलीस विभागाच्या वि
विध 10 शाखांचे स्टॉल्स उभारण्यात आले असून विद्यार्थ्यांना पोलीस दलाचे कामकाज जवळून पाहण्याची संधी मिळाली. अत्याधुनिक शस्त्रसज्जता पाहताना पिस्टल, रिव्हॉल्व्हर, AK-47, AK-56, SLR रायफल, कार्बाईन, मशीनगन, हँड ग्रेनेड, दारुगोळा आदी शस्त्रांनी विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
क्राईम सीन व्यवस्थापनाबाबत म्हणजेच गुन्हा घडल्यावर घटनास्थळ सुरक्षित कसे ठेवले जाते, पुरावे कसे गोळा केले जातात, आरोपी कसे निष्पन्न केले जातात याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिकांसह दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने प्रश्न विचारत संवाद साधला.
प्रदर्शनीत पोलीस श्वान पथकाच्या प्रात्यक्षिकाला विशेष दाद मिळाली. श्वान पथक प्रमुख PSI सुजित डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉग जॉनीने बॉम्ब शोधाचे, डॉग मॅक्सने अमली पदार्थ शोधाचे तर डॉग ब्रुनोने अडथळे पार करून गुन्हेगार पकडण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात श्वान पथकाचे कौतुक केले.
वाहतूक शाखेच्या स्टॉलवर पोलीस निरीक्षक विलास पाटील व PSI अमोल लगड यांनी हेल्मेट वापराचे महत्त्व, अल्पवयीन वाहनचालकांनी वाहन चालवू नये, मोबाईल वापर टाळावा, तसेच 108 रुग्णवाहिका व 112 पोलीस हेल्पलाईनबाबत मार्गदर्शन केले.
महिला सहायता कक्षाच्या वतीने API आरती उघडे यांनी मुलींसाठी सुरक्षा, गुड टच-बॅड टच, पॉस्को कायदा, अनोळखी व्यक्तींशी मैत्री टाळणे तसेच 1091 व 1098 टोलफ्री क्रमांकांची माहिती दिली.
सायबर शाखेच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन व बँक फसवणुकीपासून कसे सावध राहावे, वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवण्याचे महत्त्व आणि 1930 हेल्पलाईनबाबत जनजागृती केली.
या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पोलीस-जनता संबंध, पोलीस कर्तव्य, देशासमोरील आव्हाने, अभ्यासाची शिस्त, व्यसनमुक्त जीवन तसेच MPSC-UPSC परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
दरम्यान, बुधवार (दि. 8 जानेवारी) रोजी सकाळी 10 वाजता पोलीस मुख्यालयात पोलीस भरती, MPSC व UPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा पूर्व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापकांनी भरभरून स्वागत करत वर्धा पोलिसांचे आभार मानले
हिंगणघाट प्रतिनिधी फैमोद्दीन शेख✍️✍️




Post a Comment
0 Comments