Type Here to Get Search Results !

शिवाजी युथ असोसिएशन, वर्धा यांच्यावतीने स्व. राजेंद्र देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धांचे आयोजन

 शिवाजी युथ असोसिएशन, वर्धा यांच्यावतीने स्व. राजेंद्र देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धांचे आयोजन 



दिनांक १९ ते २१ डिसेंबर दरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेला विविध नामांकित संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या स्पर्धेत पुरुष गटात ‘सिटी पोलिस संघाने विजेतेपद पटकावले, तर महिला गटात ‘नव जयहिंद क्रीडा मंडळ’ संघाने प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

स्पर्धेच्या अंतिम सामना व बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान प्रबोधनकार भाऊसाहेब थुटे यांनी भूषविले. यावेळी राज्यमंत्री तथा पालकमंत्री पंकजभाऊ भोयर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून

बाष्प्के संचालक गजानन वानखेडे (मुंबई),

अभिजित ठाकरे (उपसंचालक, बाष्प्के नागपूर),

दीपक सुमद (संचालक, एस.डब्ल्यू. प्रा. लि., देवळी),

सुमेश आर.,

विदर्भ खो-खो संघटनेचे सचिव संजय इंगळे,

मुरलीधर फाले,

संतोष गुप्ता (मार्गदर्शक, शिवाजी युथ असोसिएशन, वर्धा)

यांची विशेष उपस्थिती लाभली.

स्पर्धेतील पुरुष गटात द्वितीय स्थान ‘विदर्भ युथ, तर तृतीय स्थान ‘विदर्भ क्रीडा मंडळ यांनी पटकावले.

महिला गटात द्वितीय स्थान ‘अनंत क्रीडा मंडळ, तर तृतीय स्थान ‘विदर्भ क्रीडा मंडळ, यांनी मिळविले.

वैयक्तिक पारितोषिकांमध्ये पुरुष गटात उत्कृष्ट खेळाडू म्हणून फैजल पठाण तर महिला गटात प्रीती धाकरगे यांची निवड करण्यात आली.


 नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांना स्पर्धाबद्दल माहिती मिळताच विशेष भेट दिली...


या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून शिवाजी युथ असोसिएशनचे कौतुक होत असून, यापुढे याहूनही भव्य व दर्जेदार स्पर्धा आयोजित करण्याचा मानस मंडळाचे अध्यक्ष श्याम भेंडे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल गचके, सूत्रसंचालन मनोज आखुज, तर आभार प्रदर्शन विलास देशमुख यांनी केले. 

हिंगणघाट प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️

Post a Comment

0 Comments