Type Here to Get Search Results !

सामूहिक विवाह सोहळा अल खिदमत फाऊंडेशन हिंगणघाट द्वारा आयोजित

 



सामूहिक विवाह सोहळा

अल खिदमत फाऊंडेशन हिंगणघाट द्वारा आयोजित 

ईज्तेमाई शादी सोहळा ११/०१/२०२६ रोजी सम्पन्न झाला

मोठया उत्सवात पार पडला या कार्यक्रमाला हिंगणघाट वर्धा लोकसभा क्षेत्र सांसद श्री अमर शरदराव काळे बाजार समितीचे सभापती अँड सुधीरबाबू कोठारी,हिंगणघाट नगर परिषद अध्यक्ष सौ. नयना उमेश तुलसकर ,उमेश जी तुलसकर, हिंगणघाट बाजार समितीचे संचालक डॉ. निर्मेशजी कोठारी, हिंगणघाट खरेदी विक्री संघाचे संचालक तेजसभाऊ तडस,मुस्लिम समाजचे प्रमुख नेते,शाकिर पठान, एडवोकेट इब्राहीम बक्श,हुसैन खान, अशरफ खान शेरा,सलमान भाऊ,अमोल बोरकर,नगर सेवक नितेश नवारखेड़े,हे आवर्जून ह्या सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित होते, या विवाह सोहळ्याचं पाचव वर्ष असून 12 जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाले. आयोजकचा एकच उद्देश होता की गरीब परिवारातील जोडप्यांना जास्त खर्च न लागता हा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच मंचावर उपस्थित मान्यवरांनी नव दाम्पत्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व आयोजकचे अभिनंदन केले. तसेच या सामूहिक सोहळ्याला मुस्लिम समाजातील लोक मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी शेख नईमुद्दीन


Post a Comment

0 Comments