Type Here to Get Search Results !

जनता हायस्कुल गडब येथे कवी संमेलन उत्साहात संपन्न

            धनाजी शेळके.पेण तालुका प्रतिनिधी ✍️✍️


     श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह निमित्त जनता हायस्कूल व ज्यु.कॉलेज गडब-पेण येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने शनिवार दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी "कवी संमेलन"आयोजित करण्यात आले होते.

   कविवर्य एस एस पाटील यांचे अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात आले.सदर संमेलनामध्ये व्यसनमुक्ती,निसर्गसौंदर्य,आगरी बोली समाज संस्कृती,पर्यावरण व सामाजिक परिस्थिती वर भाष्य करणाऱ्या कविता सादर केल्या.याप्रसंगी शाळा मुख्याध्यापक श्री.सोनवणे सर यांनी उपस्थित कविवर्यांचे स्वागत केले व आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना काव्य रसग्रहण करता यावे,कल्पना शक्तीला व्याकरणाची जोड देऊन आपल्या भावना शब्दांत कसे उतरावेत याबद्दल मार्गदर्शन केले.सदर कवी संमेलनात कोमसाप पेण शाखा अध्यक्ष लव्हेंद्र मोकल (कळवे), एस.एस.पाटील (जोहे), वैभव धनावडे(पेण),के पी पाटील (गडब), सदानंद ठाकूर (खारढोंबी),हिरामण पाटील (पाटणी) निरंकार पाटील (गडब) आदींना सहभाग घेतला.यावेळी कविवर्य श्री.वैभव धनावडे यांनी ग्रंथालय साठी २००० रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून दिली.संस्था कार्याध्यक्ष श्री.अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेत चित्रकला व रांगोळी प्रदर्शन भरवले होते.वेगवेगळ्या विषयांवरील चित्रे व रांगोळी विद्यार्थ्यांनी अप्रतिम रेखाटल्या होत्या.मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक देखील केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदानंद ठाकूर यांनी केले तर श्री.एस.के.पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.विद्यार्थी व शिक्षक यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते,टाळ्यांच्या प्रतिसादात संमेलनाला बहर आला होता.विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निरंकार पाटील,आर.आर.पाटील मॅडम व समस्त शिक्षकवृंद यांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments