Type Here to Get Search Results !

हिंगणघाट शिवसेनेतर्फे सामाजिक उपक्रम. ​शिवसेना पक्षातर्फे प्रेममंदिर वृद्धाश्रमात स्नेहभोजन व प्रतिमेचे वाटप.


        वर्धा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️


  • आज दिनांक २३/०१/२०२६ शुक्रवार ला वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त शिवसेना पक्षातर्फे उपमुख्यमंत्री व पक्षाचे मुख्य नेते मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार व पक्षाच्या सचिव विधानपरिषद सदस्य डॉ मनिषाताई कायंदे, लोकसभा संपर्कप्रमुख श्री राजजी दिक्षित, जिल्हाप्रमुख राजेशभाऊ सराफ,बाळाभाऊ शहागडकर, शुभांगीताई ठमेकर व उपजिल्हाप्रमुख अमितभाऊ गावंडे यांच्या मार्गदर्शनात विधानसभामधे सर्वत्र सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
  • त्यानुसार हिंगणघाट शहरातील शहालंगडीजवळील प्रेममंदीर वृद्धाश्रम येथे शिवसेना पक्षाच्या वतीने समस्त वृद्धांनाकरीता स्नेहभोजनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला प्रमुख
  •  उपस्थिती उपजिल्हाप्रमुख हिंगणघाट विधानसभा अमितभाऊ गावंडे, समुद्रपूर तालुकाप्रमुख अविनाश जामुनकर, तालुकासचिव सारंग कोयाडवार हे होते.तर कार्यक्रमाचे आयोजन हिंगणघाट शिवसेना शहरप्रमुख दिनेश काटकर यांनी केले होते.वं.बाळासाहेबांच्या फोटोला माल्यार्पण व पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
  • याप्रसंगी राहुल फुलझेले,अनुप गेडाम, विशाल माथनकर, मंगेश लोखंडे, मिलींद झरकर,अमोल देशपांडे, आशिष कैकाडे,मनिषाताई गेडाम, पल्लवीताई सराटे,अश्विनीताई गेडाम,मंदाकीनीताई ढाले,शितलताई तिवारी व समस्त शिवसैनिक उपस्थित होते.तसेच वृद्धाश्रमाचे काळजीवाहक राजूभाऊ म्हैसकर यांना साहेबांचा फोटो कार्यक्रमाची आठवण म्हणून संपूर्ण शिवसेना पक्षाद्वारा भेट देण्यात आला.

Post a Comment

0 Comments