Type Here to Get Search Results !

मुंबई चा महापौर नक्की कुणाचा होणार??

  


प्रतिनिधी : अमोल जाधव (मुंबई पूर्व) ✍️✍️

मुंबई चा महापौर नक्की कुणाचा होणार?? 

: महानगरपालिकेच्या निवडणूका होउन चार दिवस झाले सर्व पक्षांची बलाबल पहाता  अद्याप महापौर नक्की कुणाचा होईल हे अद्याप गुलदस्त्यात च राहीले आहे त्यातच फडणवीस हे स्वित्झर्लंड ला गेले आहेत त्यामुळे मुंबईतील घडामोडींना वेग आला असून एक फोन फडणवीस यांना गेला आणि आज दिवसभरात महापौरांच्या निवडी साठी कोण कुणाशी युती करेल या चर्चांना उधान आले.त्यामुळेचशिंदे गटाचे काही नगरसेवक उध्दव ठाकरेंच्या संपर्कात आहेत असे बोलले जाते.. त्यामुळेच कोण कुणशी युती करून मुंबई महानगरपालीकेच्या महापौर पदाच्या उमेदवारा विषयी उलट सुलट चर्चांना वेग आला आहे शिंदेना गाफील ठेवून उध्दवठाकरे गटाचे सर्व नगरसेवक गैरहजर राहून. भाजप बहुमतानी विजयी करणे, असा शिंदेना चेकमेट करण्याचा डाव असेल, किंवा भाजप ला बाहेर ठेवून उध्दव ठाकरे शिंदेशी युती करून आडीच आडीच वर्षाचा महापौर होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.राजकारणात काहीही होऊ शकतो. याच नियमाने पुढील वाटचाली चालुच आहेत. भाजप म्हणत आहे की पाच वर्ष महापौर आमचाच तर एकनाथ शिंदेनी काही दगाफटका होउ नये म्हणुन आपले सर्व नगरसेवक एका अज्ञात स्थळी फाईव्ह स्टार हाॅटेलवर नेवून ठेवले आहेत. त्या मुळे मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांचा तिढा सुटण्याची लक्षणं दिसत नाहीच. शिंदे गटाला बाजुला ठेवुन भाजप कुणाशी तरी युती करेल या हेतूने शिंदेनी नगरसेवक अज्ञात स्थळी नेवून ठेवल्याचे बोलले जाते. 

   तरीही येत्या दोन दिवसांत काही तरी भक्कम वाटाघाटी होउन महापौराचा तिढा सुटेल अशी शक्यता वाटते.

Post a Comment

0 Comments