मातोश्री महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेखमातोश्री आशाताई कुणावर कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, हिंगणघाट येथे राष्ट्रीय सेवा योजना व महिला अध्ययन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश महिलांचे सशक्तीकरण, शिक्षणाचे महत्त्व व समाजातील महिलांची भूमिका याबाबत विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करणे हा होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष तसेच मातोश्री महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शिका म्हणून सौ. संगीता गडवार उपस्थित होत्या. तसेच तुळसकर ऑफ फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेंद्र गुंडे, उपप्राचार्य डॉ. सपना जयस्वाल, विज्ञान विभाग प्रमुख शीतल कारमोरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी भाग्यश्री साबळे, महिला अध्ययन कमिटीच्या प्रमुख प्रा. प्रतिभा दुबे, वाणिज्य विभाग प्रमुख वैशाली तडस व शिक्षकेतर कर्मचारी ताराबाई जायदे यांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी मान्यवरांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबन किती आवश्यक आहे याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. आजच्या आधुनिक काळात महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून समाजाच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉक्टर उमेश तुळसकर यांनी महिलांचा सन्मान व्हावा व व त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करावा असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. रजनी फुटाणे तर आभार प्रा. वैशाली तडस यांनी केले.
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी,प्राध्यापकांनी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना व महिला अध्ययन कमिटीच्या वतीने करण्यात आले असून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Post a Comment
0 Comments