Type Here to Get Search Results !

विद्या विकास हायस्कुल हिंगणघाट येथे ‘जागतिक महिला दिन’ निमित्त किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी विशेष आरोग्य मार्गदर्शन सत्राचे आयोजन.

 

विद्या विकास हायस्कुल हिंगणघाट येथे ‘जागतिक महिला दिन’ निमित्त किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी विशेष आरोग्य मार्गदर्शन सत्राचे आयोजन.

                    वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख

        विद्या विकास प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, हिंगणघाट येथे जागतिक महिला दिन निमित्त किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी विशेष आरोग्य व व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. जया   निलेश  तुळसकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे मुलींच्या आरोग्यावर होणारे परिणाम, किशोरवयात होणारे शारीरिक व मानसिक बदल, पोषणयुक्त आहाराचे महत्त्व तसेच स्वच्छता व आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थिनींनीही विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

यावेळी पंचायत समिती हिंगणघाट येथील विषयतज्ञ संगीता पेठे यांनी मुलींनी शिक्षणासोबत आत्मविश्वास, स्वसंरक्षण आणि सकारात्मक विचार यांचा अंगीकार करून जीवनात प्रगती साधावी असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नितेश रोडे होते. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थिनींना आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारून शिक्षणाच्या बळावर स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थिनींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुवर्णा परबत यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ अंकिता ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सौ सुनीता कोळसे, कु प्रियंका मानकर, कु सुवर्णा तेलंग, श्री विक्रम सिडामे , श्री सुधाकर टिपले, प्रियांका पुसदेकर, वैष्णवी नाल्हे, तनया खांदनकर यांनी प्रयत्न केले. या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्य व स्वावलंबनाबाबत जागरूकता निर्माण झाली.

Post a Comment

0 Comments