Type Here to Get Search Results !

हिंगणघाट-वडनेर मार्गावर भीषण अपघात; यु-टर्न घेणाऱ्या दुचाकीस्वाराला अज्ञात आयशर ट्रकची धडक, जागीच मृत्यू ​

 

हिंगणघाट-वडनेर मार्गावर भीषण अपघात; यु-टर्न घेणाऱ्या दुचाकीस्वाराला अज्ञात आयशर ट्रकची धडक, जागीच मृत्यू

​


हिंगणघाट (वर्धा):  संपादक  - नईमुद्दीन शेख

महामार्ग क्रमांक ४४ वरील महापारेषण (MSEDCL) कार्यालयासमोर हिंगणघाट ते वडनेर रोडवर झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ११:४० वाजता हा अपघात घडला.

​मृतक बंडू श्रीधर नव्हाते (वय ५८ वर्षे, रा. वणी छोटी, ता. हिंगणघाट) असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मृतक बंडू नव्हाते हे हिंगणघाट येथून दूध विकून आपल्या वणी (छोटी) गावाकडे जात होते. महामार्ग क्रमांक ४४ वरील महापारेषण समोरील यु-टर्नवरून ते आपली मोटारसायकल (क्र. MH 32 G 9470) वळवत असताना, मागून अत्यंत भरधाव वेगात व निष्काळजीपणे आलेल्या एका अज्ञात आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

​या भीषण धडकेत बंडू नव्हाते हे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

​घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र जामचे सपोनि सरिता यादव, पोलीस उपनिरीक्षक (PSI) तोडासे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पुढील कायदेशीर तपास हिंगणघाट पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 ratutogel ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88