वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख✍️✍️
- हिंगणघाट शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व आझाद हिंद सेनेचे श्री सुभाष चंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
- आज दिनांक:- २३ जानेवारी २०२६ ला सकाळी ठीक :-१०:३० वाजता हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व आझाद हिंद सेनेचे श्री सुभाष चंद्र बोस यांची जयंतीच्या कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मा. श्री. राजेंद्र खूपसरे , जिल्हाप्रमुख शिवसेना- वर्धा जिल्हा , तसेच श्री. सतीश धोबे उपजिल्हाप्रमुख हिंगणघाट तसेच श्री. मनीष देवडे तालुकाप्रमुख हिंगणघाट यांच्या उपस्थितीत तेजस मेडिकल, श्री. राजभाऊ खूपसरे यांच्या हॉलमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे २३ जानेवारी २०२६ रोजी जन्मशताब्दी वर्ष आहे. १९२६ मध्ये जन्मलेले बाळासाहेब ठाकरे हे व्यंग चित्रकार, 'सामना'चे संपादक आणि शिवसेनेचे संस्थापक होते. मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण केला.
- बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी झाला. त्यांचे वडील 'प्रबोधनकार' केशव सीताराम ठाकरे हे समाजसुधारक होते, ज्यांचा वारसा त्यांनी पुढे चालवला.
- व्यंगचित्रकार ते राजकारणी: करिअरची सुरुवात 'फ्री प्रेस जर्नल'मध्ये व्यंगचित्रकार म्हणून केली. १९६६ मध्ये त्यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी 'शिवसेना' पक्षाची स्थापना केली.
- हिंदुत्व आणि राजकीय दबदबा: कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात 'हिंदुहृदयसम्राट' अशी ओळख निर्माण केली.शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' या मराठी दैनिकाचे ते संस्थापक आणि प्रमुख संपादक होते. या कार्यक्रमात श्री. सुनील आष्टीकर, श्री. केशव तळवेकर व सौ. सारिका अनासाने, सौ. नीताताई धोबे,श्री. मनीष देवडे व वर्धा जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्री. राजेंद्र खूपसरे यांनी बैठकीत उपस्थित शिवसैनिकांसमोर
- मा.बाळासाहेब ठाकरे यांचा आयुष्यातील एक मोठा काळ महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत व्यतीत केला. असे बैठकीत संबोधित केले.
- कार्यक्रमात सर्वश्री प्रकाश अनासाने उप तालुका प्रमुख,श्रीधर कोटकर,नगर सेविका राजेश्री देवढे,सौ. करूनाताई वाटकर,माजी उपाध्यक्ष न. प.हि चे भोलाभाऊ चौहान, नंदुभाऊ रेडलावर, अशोकभाऊ लडी, सौ. कलावती ताई निखाडे, नूरी ताई शेख,गुणवंतजी वानखेडे, गजानन काटवले,शंकर मोहमारे,अमोल वादाफडे,दिलीप चौधरी,सुभाष काटकर, सुरेश गायकवाड, सचिन पोटदुखे, विजय अष्टांकर, प्रशांत सुपारे, हिरामण आवारी,अनंता गलांडे, लक्ष्मण बकाने, नरेंद्र गुलकरी,संजय पिंपळकर,अनिल पोटफोडे, दिलीप वैद्य, भास्कर भिसे,गजानन ठाकरे,सचिन मूडे, केशव तळवेकर,शेख नाईम कादिर,शांताराम मुरकुटे, अशोक बावणे,हेमंत सहारे,शुभम धानगाये,सौमित्र आप्टे,राहुल मोहितकर,कवडुजी कळंबे, बलराज डेकाटे,प्रशांत कांबळे,नितीन वैद्य, हरदीप काळे, संजय रहाटे,विलास चौधरी, रवी कुटे, दिनेश धोबे, विकास दाणी, प्रकाश भुसारी इत्यादी शिव सेनीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments