Type Here to Get Search Results !

​हिंगणघाट पुलिस की बड़ी कार्रवाई: गांजा तस्करी करते हुए एक युवक गिरफ्तार

 ​

वर्धा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️


  • हिंगणघाटमध्ये 175 ग्रॅम गांजासह युवक अटकेत, दुचाकी जप्त
  •                           
  • हिंगणघाट :- शहरात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत 175 ग्रॅम गांजासह एका युवकास अटक केली आहे. ही कारवाई 20 जानेवारी रोजी रात्री 11.10 वाजण्याच्या सुमारास शहालगंडी मंदिर रोड परिसरात करण्यात आली.
  • पोलीस स्टेशन हिंगणघाट अंतर्गत अप.क्र. 0058/2026 नुसार आरोपी प्रज्योत विरसेन थुल (वय 23, रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट) याच्यावर एन.डी.पी.एस. अॅक्ट 1985 अंतर्गत कलम 8(क), 20(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून पंचनामा करून नाकेबंदी करण्यात आली. संशयित आरोपीची व त्याच्या वाहनाची कायदेशीर झडती घेतली असता त्याच्याकडे प्लास्टिक पन्नीत हिरवट-काळपट रंगाचा ओलसर गांजा आढळून आला. गांजाचे एकूण वजन 177 ग्रॅम असून निव्वळ गांजा 175 ग्रॅम (अंदाजे किंमत 3,500 रुपये) इतका आहे.
  • यासोबतच आरोपीकडील जुनी वापरती निळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस दुचाकी (क्र. MH-32-AX-4066) किंमत अंदाजे 60,000 रुपये अशी एकूण 63,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
  • या प्रकरणी पुढील तपास पोलीस स्टेशन हिंगणघाट करीत आहेत.

Post a Comment

0 Comments