वर्धा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️
सेलू मध्ये लोकाभिमुख निर्णयांचा धडाका: पाणीटंचाई कृती आराखड्यास मंजुरी, ३६ अतिक्रमणधारकांना स्थायी पट्ट्यांचे वाटप*
हिंगणघाट
दिनांक २० जानेवारी
पंचायत समिती सभागृह, सेलू येथे आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२५–२६ साठीच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्या संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सेलू तालुक्यातील गावांमधील ३६ अतिक्रमणधारकांना महसूल व गावठाण अंतर्गत स्थायी पट्ट्यांचे वितरण करण्यात आले, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली.
या उपक्रमाचा लाभ प्रामुख्याने हेलोडी, हमदपूर, दहेगाव व बोंडसुला येथील अतिक्रमणधारकांना झाला असून, त्यांच्या दीर्घकालीन निवास व हक्कांना अधिकृत मान्यता मिळाल्याने सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
या बैठकीस सेलूच्या तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे, जिल्हा परिषद वर्धाचे कार्यकारी अभियंता श्री. परांडे, सिंदी रेल्वेच्या मुख्याधिकारी पौर्णिमा गावित, गटविकास अधिकारी देवानंद पाणबुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर शेंडे यांच्यासह सरपंच, विविध विभागांचे अधिकारी, ग्रामसेवक व कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणीटंचाईवर वेळेत आणि प्रभावी उपाययोजना राबविणे तसेच सामान्य नागरिकांना न्याय देणारे निर्णय घेणे, हीच लोकाभिमुख प्रशासनाची दिशा असल्याचे यावेळी आमदार कुणावार यांनी अधोरेखित केले.

Post a Comment
0 Comments