Type Here to Get Search Results !

वंचित बहुजन आघाडीचे नेते अश्विन तावाडे यांनी मा. नगराध्यक्ष मॅडम, हिंगणघाट यांना निवेदन दिले

 वर्धा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️


दिनांक : २०/०१/२०२६ | हिंगणघाट
वंचित बहुजन आघाडीचे नेते अश्विन तावाडे यांनी मा. नगराध्यक्ष मॅडम, हिंगणघाट यांना निवेदन दिले
हिंगणघाट शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सामाजिक समता व न्यायाच्या मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडत वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा हिंगणघाट विधानसभा उमेदवार मा. अश्विन तावाडे यांनी आज नगर परिषद हिंगणघाटच्या नवनियुक्त मा. नगराध्यक्ष मॅडम यांना निवेदन सादर केले.
यावेळी भीमसे बहुउद्देशीय सामाजिक संस्था, हिंगणघाट तर्फे नवनियुक्त नगराध्यक्ष मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर निवेदनामध्ये हिंगणघाट शहराच्या विकासासंदर्भातील खालील महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या—
नवीन बांधण्यात आलेल्या नगर परिषद हिंगणघाट इमारतीस “राजगृह” हे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याचा सन्मान म्हणून हे नाव देणे आवश्यक असल्याचे अश्विन तावाडे यांनी नमूद केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हिंगणघाट येथील पुतळा परिसरात सुरू असलेले सौंदर्यीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत नाराजी व्यक्त करत, सदर काम उच्च दर्जाचे करून परिसर त्वरित समाजासाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच पुतळ्याच्या मागील जागेला “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान” नाव देऊन बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित तेलचित्र व POP वॉलच्या माध्यमातून जीवनचरित्र साकारावे, अशीही मागणी करण्यात आली.
हिंगणघाट नगर परिषद हद्दीतील सर्व लेआऊट / नगरींमधील ओपन प्लेस जागांचे समान व न्याय्य वाटप करण्यात यावे, जेणेकरून सर्व समुदायांना त्यांच्या श्रद्धास्थानांची उभारणी करता येईल व भविष्यात सामाजिक वाद टळतील, यावरही भर देण्यात आला. विशेषतः बौद्ध समाजालाही समान न्याय देण्यात यावा, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली.
यावेळी नगर परिषद प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली..!

Post a Comment

0 Comments