वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व कुसुम (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) मोहीम हिंगणघाट.
दिनांक ३० जानेवारी २०२६ ते १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत हिंगणघाट शहरात राबविण्यात येणार आहे. मोहीम
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ,
जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल बेले,
सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) वर्धा. डॉ.राज पराडकर , वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट डॉ. आशिष लांडे,तालुका आरोग्य अधिकारी हिंगणघाट डॉ. प्रभाकर नाईक, सहाय्यक संचालक आरोग्य सहा ,(कुष्ठरोग )वर्धा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल येळणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे
मोहिमेच्या कालावधीत विशेषजनजागृती करण्यात येणारआहेत . महिला मेळावे, शाळा भेटी, प्रभात फेरी, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे.
कुसुम (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) मोहीम अंतर्गत मुला - मुलींची निवासी वसतिगृह तपासणी, तपासणी पासुन वंचित राहिलेला घटक यांची तपासणी करण्यात येणार आहे त्यामधुन निघालेल्या नवीन रुग्णाला औषध उपचाराखाली आणले जाईल हम तो उद्देश आहे. असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकक डॉ. आशिष लांडे सर यांनी सांगितले
त्याचाच एक भाग म्हणुन आज दिनांक २८ जानेवारी २०२६ ला तुळसकर कॉलेज ऑफ सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हिंगणघाट येथे प्रश्नमंजुषा कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व तुळसकर कॉलेज ऑफ सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेला होता यामध्ये बी.बी.ए.,एम. बी.ए, व एम.सी.ए. विभागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आलेले होती. य् तीन ग्रुप करून विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाविषयी प्रश्न विचारुण गुण देण्यात आले व प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक देण्यात आला तसेच त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
यावेळी परीक्षक म्हणुन भारत विद्यालय हिंगणघाट येथील श्री मिलिंद सावरकर सर लाभले होते यांनी मुलांना प्रश्नमंजुषाची सविस्तर माहिती देऊन प्रश्नमंजुषा साठी सुरुवात केली व गुणांकन दिले.
कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजविलास कारमोरे यांनी चांगले सहकार्य केले तसेच कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. राकेश साटोणे सर यांनी कार्यक्रमाचे सर्व पाहणी केली संचालन केले.
श्री प्रशांत जंगठे अवैद्यकिय सहाय्यक उपजिल्हा रुग्णालयात हिंगणघाट यांनी कुष्ठरोग प्रश्नमंजुषा मध्ये विचारलेल्या प्रश्नांचे सहभागी विद्यार्थ्यांना उत्तरे सांगुन कुष्ठरोग आजाराबाबत सविस्तर माहिती सांगितली.
श्री उमेश मेश्राम आरोग्य निरीक्षक यांनी कुष्ठरोगावर देण्यात येणारे औषध उपचार कुठे उपलब्ध आहे याबाबत माहिती सांगितली.
असलम फारुकी यांनी कुष्ठ रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा बाबत माहिती सांगितली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.मनोज रघटाटे सर, प्रा. प्रतीक मोघे व इतर शिक्षक वृंद, मॅडम यांनी सहकार्य केले.
आभार प्रदर्शन प्रा. कलावती कुडे मॅडम यांनी केले

Post a Comment
0 Comments