आज नगरपरिषद हिंगणघाट येथे शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सर्व विभाग प्रमुखांसह आढावा बैठक पार पडली. या बैठकीस नगराध्यक्षा सौ. नयना तुळसकर, मुख्याधिकारी श्री. प्रशांतजी उरकुडे तसेच नगरपरिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व नाले, आरोग्य सेवा, वीज, नागरी सुविधा, तक्रार निवारण तसेच सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांची सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष देत, कामांचा दर्जा, वेळेत अंमलबजावणी आणि पारदर्शकता राखण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले.
नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन लोकाभिमुख प्रशासन देण्यावर भर दिला. मुख्याधिकारी श्री. प्रशांतजी उरकुडे यांनी विभागनिहाय कामांचा आढावा सादर करत, विविध अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या-आपल्या कार्यक्षेत्रातील प्रगती, अडथळे आणि पुढील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली.
या आढावा बैठकीत शहराच्या नियोजित विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या समस्या वेळेत सोडवणे, मूलभूत सुविधा अधिक सक्षम करणे आणि हिंगणघाट शहर स्वच्छ, सुरक्षित व प्रगत बनवणे या उद्दिष्टांसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करतील, असा विश्वास या बैठकीतून व्यक्त करण्यात आला. उपसंपादक फैमोद्दीन शेख ✍️✍️




Post a Comment
0 Comments