*
समता सैनिक दलाचे मार्शल अर्पित वहाने यांनी केले रक्तदान
अर्पित वाहाणे
आर्वी वर्धा
वर्धा: रक्तदान हेच जिवनदान या उदात्त भावनेतून समता सैनिक दल मार्शल अर्पित वहाणे यांनी 1जानेवारी 2025 रोजी भिमा कोरेगाव येथे जाऊन शौर्य दिनानिमित्त रक्तदान करुन डाॕ.बाबासाहेब आंबेडकर याना आभिवादन केले.
अर्पित वहाणे हे समता सैनिक दलाचे पुर्णवेळ कार्यकर्ते आहेत.जिल्ह्यात समता सैनिक दल वाढविण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.सामाजिक बांधिलकीच्या नात्याने दर तीन महिन्याला रुग्णालयात जाऊन ते गरजवंत रुग्णांना रक्तदान करतात.अडचणीत सापडलेल्र्या रुगणांना
ताबडतोब मदत पोहचविण्यास तत्पर असल्यामुळे ते संपूर्ण जिल्ह्यात रुग्णमित्र म्हणून प्रसिद्ध आहेत.
रक्तदान केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रत्येकांनी एकदा तरी रक्तदान करावे असे त्यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले.
यावेळी त्यांचे समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक अभय कुंभारे,प्रदीप कांबळे,चंदू भगत,मारोतराव डंभारे,लांबेजी आदींनी अभिनंदन केले.
हिंगणघाट प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️

Post a Comment
0 Comments