मातोश्री महिला महाविद्यालयात
"राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकनंंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिन" साजरा करण्यात आला.
मातोश्री आशाताई कुणावर कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS), आय. सी. सी. व विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालय, हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमानाने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकनंंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रिय युवा दिनाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपप्राचार्या डॉ. सपना
जयस्वाल ,प्रमुख मागर्दर्शक प्रा.गणेश इंगोले, टी.आय. एस. टी. चे उपप्राचार्य प्रा. राकेश साठोने, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.भाग्यश्री साबळे,आय. सी. सी. कमेटीच्या समन्वयक प्रा.दर्शना रेंढे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. वैशाली तडस, विज्ञान विभाग प्रमुख शीतल कारमोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकनंंद यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलित करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.गणेश इंगोले यांनी विद्यार्थ्याना राजमाता जिजावू व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याची महती विषद केली.अध्यक्षस्थानी असलेल्या डॉ.सपना जयस्वाल यांनी राजमाता जिजावू आणि स्वामी विवेकानंंद यांच्या कार्याची प्रेरणा विध्यार्थ्यानी आपल्या अनुकरनात आत्मसात कारावी याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मीनाक्षी पावडे , प्रास्ताविक प्रा. भाग्यश्री साबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पुनम बुरीले यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेतला.
हिंगणघाट प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️

Post a Comment
0 Comments