Type Here to Get Search Results !

उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा

 


प्रतिनिधी : अमोल जाधव (मुंबई पूर्व) ✍️✍️

उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा


उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या नगरसेविका सुरेखा सोनावणे आणि नगरसेवक विकास खरात यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले.

यावेळी कल्याण–डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचीही उपस्थिती होती. आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभागातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी हा पाठिंबा देत असल्याचे नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले.

या भेटीप्रसंगी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक योगेश जानकर तसेच शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments