Type Here to Get Search Results !

वर्धा शहर पोलिसांची मोठी कारवाई; दुचाकी चोरट्यास अवघ्या काही दिवसांत ठोकल्या बेड्या!

 


वर्धा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️

वर्धा: घरासमोरून दुचाकी लंपास करणाऱ्या एका सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात वर्धा शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेली ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल हस्तगत केली आहे.


​युगंधर मनोज कार्लेकर (रा. महादेव पुरा, वर्धा) यांनी आपली काळ्या रंगाची 'होंडा ड्रीम युगा' (क्र. MH 27 CP 3140) ही दुचाकी २४ डिसेंबर २०२५ च्या रात्री घरासमोर लॉक करून उभी केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना आपली दुचाकी गायब असल्याचे दिसून आले. या प्रकरणी वर्धा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली होती.


​या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाला खबऱ्यामार्फत ठोस माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी १८ जानेवारी २०२६ रोजी आदित्य अनिल ठाकरे (वय २०, रा. केजाजी चौक, गोंडप्लॉट, वर्धा) याला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष चौकशी केली असता, त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त केली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.


​ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर आणि ठाणेदार संतोष ताले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये:


​पीएसआय: शरद गायकवाड

​कर्मचारी: महेंद्र पाटील, अभिजीत वाघमारे, रंजित भुरसे, अमोल साळवन आणि अमोल ढोबळे यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments