Type Here to Get Search Results !

वर्धा नगर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षकांवर उपासमारीची वेळ; तीन महिन्यांपासून पेन्शन बंद!

 

वर्धा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️



वर्धा नगर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षकांवर उपासमारीची वेळ; तीन महिन्यांपासून पेन्शन बंद!


वर्धा: वर्धा नगर परिषदेच्या प्रशासकीय अनास्थेचा फटका सेवानिवृत्त शिक्षकांना बसत असून, माहे नोव्हेंबर २०२५ पासून त्यांना पेन्शन मिळालेली नाही. गेल्या तीन महिन्यांपासून आर्थिक ओढताण होत असल्याने या ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून, औषधोपचारासाठी पैसे नसल्याने अनेकांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.


ज्या शिक्षकांनी आयुष्यभर समाजाला घडवण्याचे काम केले, त्यांनाच आता उतारवयात आपल्या हक्काच्या पैशांसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. थकीत पेन्शनमुळे केवळ दैनंदिन खर्चच नव्हे, तर बीपी, शुगर आणि इतर गंभीर आजारांची औषधे खरेदी करणेही कठीण झाले आहे. "प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून, आमच्या जगण्याच्या अधिकारावर गदा येत आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया सेवानिवृत्त शिक्षकांनी व्यक्त केली आहे.


या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा आणि प्रलंबित पेन्शन तात्काळ अदा करावी,

Post a Comment

0 Comments