वर्धा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️*
सेवाकार्यातील आशीर्वादाने यशाचे आनंद प्राप्त होतील !.....अशोकराव बारब्दे*
*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई-कोकण विचारमंथन मेळावा संपन्न.*
विविध बळींना श्रध्दांजली,अतिथी सन्मान,नियुक्ती पत्रे,आय कार्ड वितरण
*मुंबई /अकोला-* पत्रकार हक्क,कल्याणासोबतच लोकस्वातंत्र्य चळवळीतून समाजातील गरजवंतांच्या समस्या निर्मुलन,कल्याण आणि भौतिक विकासांच्या गरजांसोबतच आरोग्यसेवेत मानवी सेवा करत राहण्यासारखा दुसरा आनंद नाही. समाजातील माणसांसाठी या पत्रकार चळवळीतून सर्व सहकाऱ्यांसह आपण अव्याहत कार्यरत रहावे.त्यातील प्राप्त आशीर्वादाच्या शक्तीनेच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ अधिक बळकट होऊन उदात्त कार्याच्या अधिक क्षमता निर्माण करेल.असे प्रतिपादन निवृत्त मंत्रालयीन सचिव व मुंबईतील विदर्भ वैभव मंदिराचे अध्यक्ष अशोकभाऊ बारब्दे यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा कोकण- मुंबई विभागाचा १० वा विचारमंथन मेळावा विदर्भ वैभव मंदिरात नुकताच संपन्न झाला.त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्ष संजय देशमुख यांनी निष्ठा,कर्तव्यभावना आणि संघटनेतील संपर्काचे महत्व ओळखून नुसता मोबाईल वापरून काम करण्याची ईच्छाशक्ती ठेवणे हेच संघटन वाढीचे तंत्र ठरू शकते हे सत्य अधोरेखित केले.सोबतच उपक्रमांनी शासन प्रशासनाकडे वाढलेल्या प्रभावातून मिळत असलेल्या प्रतिसादाची उदाहरणे सादर केली.
याप्रसंगी विदर्भ वैभव मंदिराचे सरचिटणीस गजाननजी नागे प्रमुख अतिथी म्हणून तर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,राष्ट्रीय पदाधिकारी पुष्पराज गावंडे तर महाराष्ट्र संघटन प्रमुख अरविंदराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे बाबा यांना वंदन-अभिवादन करण्यात आले.देशातील शहिद जवान,आत्महत्त्याग्रस्त शेतकरी,अत्याचारग्रस्त महिला बळी,दिवंगत पत्रकार,नैसर्गिक आपत्तीत व अपघातग्रस्त बळींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
मंत्रालयीन समन्वयक व महाराष्ट्र संघटन प्रमुख रफिक मुलानी,ठाणे जिल्हा संघटनप्रमुख संजय सोळंके,मुंबई महिला आघाडी प्रमुख सौ.सुषमा ठाकूर-ढोले,उमेश चौधरी,राजीव विश्वकर्मा, विदर्भ समाज समाज मिरा- भाईंदर अध्यक्ष संजय जायभाये,माळी,विकास भोसले,राजेन्द्र आंगणे,सी.ए.तुषार तल्हार,सौ.प्रतिक्षा तल्हार, व अनेक पत्रकार या मार्गदर्शन,सन्मान तथा स्नेह मिलन मेळाव्यात उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन सौ.सुषमा ठाकूर- ढोले यांनी केले.

Post a Comment
0 Comments