वर्धा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️
*आप चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन.*
*मागणी पुर्ण न झाल्यास करणार तीव्र आंदोलन श्रीकांत दोड*
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक आर्वी रोड येथील नालीच्या अर्धवट सोडलेल्या बांधकामाला पुर्ण करण्यात यावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिनांक 3 जुन 2025 रोजी निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती, त्या अनुषंगाने त्या नंतर सातत्यानं पत्र व्यवहार आणि पाठ पुरावा करण्यात आला, पण सदर मागणीवर तत्कालाईन कार्यकारी अभियंता श्री. सतीश अंबोरे यांनी सबंधित विभागाला सुचना देऊन आणि पत्रव्यवहार करून तात्पुरते वेळ काढू प्रवृती वापरली, मागणीला गांभीर्याने न घेता दुर्लक्षित करण्यात आल्याचे गेल्या 8 महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीत वरून निदर्शनास येत आहे, या दरम्यान सबंधित कार्यकारी अभियंता सतीश अंबोरे हे निवृत्त झाले आणि त्या नंतर नवीन कार्यकारी अभियंता यांना संपुर्ण प्रकरणाची माहिती देण्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात दुपारी 12.00 चे सुमारास आप पदाधिकारी निवेदनासह पोहचले असता साहेब दुपारी 1.30 वाजे पर्यंत कार्यालयात पोहचले नव्हते, या संदर्भात कार्यालयीन कर्मचारी यांच्या कडे विचारणा केली असता साहेब नागपूर वरून अपडाऊन करतात, त्या मुळे त्यांना यायला उशीर होतो अशी प्राथमिक माहिती आप शिष्टमंडळाला मिळाली, सरते शेवटी उप कार्यकारी अभियंता रोहित चंदेले यांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या भोंगळ कारभार विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने तीवर नाराजी व्यक्त करत सबंधित विभागाला आज रोजी स्मरण निवेदन सादर करून अर्धवट बांधकाम सोडलेल्या नालीचे तात्काळ काम पुर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा गर्भीत इशारा आप जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांच्या वतीने देण्यात आला.
या वेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड, संजय आचार्य, असलम पठाण, दत्ता भोंबे, खालिद खान, मयुर राऊत, समीर खान, संदीप डंभारे, शाहरुख पठाण, कुणाल लोणारे, अफसर अली प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments