नवीन मुंबईतील दोन दिवसापूर्वी प्रचारा दरम्यान झालेल्या तुरळक हाणामारीच्या घटनांमुळे मतदान तणावपूर्ण वातावरणात पार पडले.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष नवीन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकी कडे लागलेले आसताना ही निवडणूक जरी शांततेत पार पडली आसली तरी खरी लढत ही शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यांतच होईल असे जरी चित्र असले तरी गणेश नाईक विरूद्ध एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेची ठरली आहे .कारण ऐरोली चे दिग्गज शिलेदार विजय चौगुले, एम के मढवी. कोपरखैरण येथील शिवराम पाटील, पुढे तुर्भे स्टोअर चे सुरेश कुळकर्णी, विरूध्द अमृत मेढकर, तुर्भे गावातील चंद्रकांत पाटील विरूद्ध,रामचंद्र घरत, जयवंत सुतार, अश्या एकमेकां समोर उभ्या असलेल्या दिग्गज शिलेदारांचे राजकीय अस्तित्व पणाला लागलेले आहे.
एकंदरीत मुंबई, ठाणे, नवीन मुंबई,पनवेल या अती महत्वपूर्ण महानगरपालिकेवर भाजप च्या आघाडीवर आहेत असा एक्झिट पोल नुसार असा अंदाज दर्शविला जातो , शाई पुसुन दुबार मतदान केल्याच्या गोंधळाच्या व तणावपूर्ण वातावरणात नवीन मुंबईत महानगरपालिकेच्या मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.असे ही म्हटले जात आहे.
नवीन मुंबई, प्रतिनिधि, प्रदीप पाटील

Post a Comment
0 Comments