मातोश्री महाविद्यालयात उत्सव संस्कृतीचा---- जल्लोष युवा शक्तीचा सांस्कृतिक महोत्सव 2026 जल्लोषात साजरा
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख
मातोश्री आशाताई कुणावार कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, हिंगणघाट व विद्याविकास कनिष्ठ महाविद्यालय, हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमानाने सांस्कृतिक विभागातर्फे सांस्कृतिक महोत्सव उत्सव संस्कृतीच्या------ जल्लोष युवाशक्तीचा 2026 आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष नगरपरिषद हिंगणघाट च्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर , तसेच प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील, संभाजीनगर अमरावती, कार्यक्रमाचे उद्घाटन श्रद्धाताई कुणावार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मातोश्री महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर, तुळसकर कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. महेंद्र गुंडे, तुळसकर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. राजविलास कारमोरे , विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक नितेश रोडे, ब्रिलियंट सीबीएससी स्कूलचे मुख्याध्यापक विलास राऊत या सर्वांची उपस्थिती होती.
अतिथी देवो भव या मूल्याला जपत पाहुण्यांचे स्वागत लेझीम पथकाने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तसेच आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान, आधारवड स्व. पांडुरंगजी तुळसकर , स्व. आशाताई कुणावार, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सपना जयस्वाल यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याकरिता प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे उद्घाटन करताना श्रद्धाताई कुणावार यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्याकरिता अशा प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले याबद्दल संस्थेचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी गुंजन पाटील यांनी आपल्या काव्यपंक्तीतून विद्यार्थ्यांमध्ये नवी प्रेरणा जागृत करण्याचा प्रयत्न केला जर आपली संस्कृती जोपासयची असेल तर अशा पद्धतीचे व्यासपीठ प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नयना तुळसकर , विद्या विकास शिक्षण संस्थेच्या सचिव तथा नगरपरिषद हिंगणघाटच्या नगराध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना बदलत चाललेल्या जीवनशैलीबद्दल जाणीव करून दिली. आपली संस्कृती, मूल्य जपणे ही काळाची गरज बनली आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजय बिरे यांनी केले तर आभार प्रा. वैशाली तडस यांनी मानले.
कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक महोत्सव दरम्यान दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी क्रीडा महोत्सव तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी आनंद मेळावा आयोजित करण्यात आला. 19 फेब्रुवारी 2026 रोजी विद्यार्थिनींनी नाटक,नृत्य,भारुड व पोवाडा चे सादरीकरण केले. दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी वादविवाद स्पर्धा तर 21 फेब्रुवारी 2026 रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न संस्थेचे अध्यक्ष डॉ. उमेश तुळसकर यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नाही तर शिक्षकांनी सुद्धा सहभाग घेऊन विद्यार्थ्यांमध्ये नवीन प्रेरणा जागृत करण्याचा छोटासा प्रयत्न केला.
मातोश्री महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संगीता लांडगे, विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पूनम बुरीले यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


Post a Comment
0 Comments