Type Here to Get Search Results !

महाराजांचे विचार हे आजच्या पिढीला आत्मसात करणे गरजेचे आहे - सुप्रसिद्ध कवियत्री गुंजन पाटील

           वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख                                  



विद्या विकास शिक्षण संस्था, हिंगणघाट द्वारा संचालित पांडुरंग तुळसकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ,हिंगणघाट  येथील सांस्कृतीक विभागाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवियत्री गुंजन पाटील , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याविकास शिक्षण संस्थेच्या सचिव तथा नगरपरिषद हिंगणघाटच्या नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, विद्या विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच मातोश्री आशाताई कुणावार कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, हिंगणघाट चे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर, विद्या विकास ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक नितेश रोडे,  पांडुरंग तुळसकर ग्रुप ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हिंगणघाट चे प्राचार्य डॉ. राजविलास कारमोरे, पांडुरंग तुळसकर ग्रुप ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. महेंद्र गुंडे, ब्रिलियंट सी.बी.एस.सी. स्कूलचे मुख्याध्यापक विलास राऊत, मातोश्री महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. सपना जयस्वाल या सर्वांची उपस्थिती होती. 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तथा महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. तसेच शिवगर्जना सादर करण्यात आली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. सपना जयस्वाल  यांनी केले. महाराजांच्या कर्तुत्वाची जाण त्यांनी आपल्या वक्तव्यातून करून दिली. सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांनी महाराजांच्या जीवनशैलीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यांनी महाराष्ट्रासाठी काय स्वप्न पाहिले होते हे विद्यार्थ्यांना अगदी हास्य विनोदी कवितांतून समजून सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून शहराच्या प्रथम नागरिक  डॉ. नयना तुळसकर  यांनी विद्यार्थ्यांना खरं जीवन काय असतं आणि ते कसं जगावं हे महाराजांकडून शिकलं पाहिजे हे विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मराठी विभाग प्रमुख अजय बिरे यांनी  केले. तर आभार वाणिज्य विभाग प्रमुख वैशाली तडस यांनी मानले. 

मातोश्री आशाताई कुणावार कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, हिंगणघाटच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख तसेच विद्यार्थी विकास विभाग प्रमुख संगीता लांडगे, विद्या विकास ज्युनिअर कॉलेजच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख पूनम बुरीले, पांडुरंग तुळसकर ग्रुप ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स हिंगणघाटच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रद्धा राऊत, पांडुरंग तुळसकर ग्रुप ऑफ फार्मसी चे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रणय बुरिले यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. कार्यक्रमाकरिता सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केले.




Post a Comment

0 Comments