Type Here to Get Search Results !

हिंगणघाटमध्ये स्पर्श कुष्ठरोग जनजागृती प्रश्नमंजुषा कार्यक्रम यशस्वी

             

  🗞️   वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख 🗞️

        

आज दिनांक 4/2/2026 ला सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) वर्धा व वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता...

    आज स्पर्श कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रमांतर्गत भवन्स जी .व्ही. एम. हिंगणघाट येथे प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तीन शनी सहभाग घेतला होता एक सेंट जॉन कॉन्व्हेंट हिंगणघाट महेश ज्ञानपीठ विद्यालय हिंगणघाट भवन्स जी. व्ही. एम .हिंगणघाट या शाळेने सहभाग घेतला होता वर्ग 7,8,9 चे चार विद्यार्थी सहभागी झाले होते . तसेच सर्व शाळेतील शिक्षक वृंद होते.

प्रश्नमंजुषा कार्यक्रम डॉ. राज पराडकर, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) वर्धा व डॉ.आशिष लांडे ,वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.आशिष लांडे ,वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट , तर प्रमुख पाहुणे डॉ.राहुल भोयर, वैद्यकीय अधीक्षक (प्रभारी) ग्रामीण रुग्णालय वडनेर व वैद्यकीय अधिकारी हिंगणघाट, प्राचार्या.सौ. धरती तामगिरे, भवन्स जी. व्ही.एम. हिंगणघाट, श्री. एन .एस. बरेंडिया, जिल्हा अवैद्यकीय पर्यवेक्षक सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग)कार्यालय वर्धा, उपप्राचार्य प्रा. राकेश साटोने तुळसकर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँन्ड

टेक्नॉलॉजी, श्री मिलिंद सावरकर विशेष शिक्षक (कला) भारत विद्यालय हिंगणघाट उपस्थित होते.

प्रश्नमंजुषाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते सरस्वतीचे मातेचे पुजन करून दिप्रज्वलाने करण्यात आली.

प्रश्नमंजुषा ही दोन फेरीमध्ये घेण्यात आली एक लेखी स्वरूप दुसरी दुसरी बजर राऊंड यामध्ये मुलांना स्क्रीनवर प्रश्न दाखवुन उत्तर विचारण्यात आले याची मूल्यांकन श्री मिलिंद सावरकर विशेष शिक्षक (कला)यांनी दिले. व प्रथम, द्वितीय ,तृतीय क्रमांक शाळेला देण्यात आला. 

प्रथम क्रमांक भवन्स जी. व्ही.एम. हिंगणघाट, 

द्वितीय क्रमांक सेंड जॉन कॉन्व्हेंट हिंगणघाट 

तृतीय क्रमांक ज्ञानपीठ विद्यालय हिंगणघाट 

यांना प्राप्तगुणानुसार देण्यात आला देण्यात आला. 

डॉ.आशिष लांडे सर यांनी मुलांनी असाच सहभाग घ्याव्या असे आवाहन केले तसेच सन 2027 पर्यंत कुष्ठरोग प्रसार कमी करून कुष्ठरोग निर्मुलन साध्य करू यासाठी आपली मदत होईल त्यामुळे अशा स्पर्धा घेण्यात येतात असे सांगितले.

श्री. एन .एस .बरेंडिया , यांनी कुष्ठरोग आजारबाबत लक्षणे, औषधोपचार व इतर माहिती सांगितली.

श्री प्रशांत जंगठे, अवैद्यकिय सहाय्यक यांनी कुष्ठरुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा व संदर्भसेवा बाबत माहिती व संशयित रुग्ण दिसल्यास कोणत्याही जवळच्या सरकारी दवाखान्यात पाठवावे जेणेकरून लवकर निदान व औषध उपचार सुरू करता येईल व कुष्ठरोग निर्मुलनाचे ध्येय साध्य होईल अशी माहिती दिली.

सौ. धरती तामगिरे , प्राचार्य मॅडम यांनी अश्या कार्यक्रमात आम्ही सहकार्य करू व मुलांचा सहभाग घेऊन सहकार्य करू असे सांगितले.

प्रश्नमंजुषेचे सूत्रसंचालन रोहिणी सावरकर , प्राथमिक यांनी केले 

तर आभार प्रदर्शन स्वप्निल आगाशे सर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. उमेश मेश्राम आरोग्य ,निरीक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट, असलम फारुकी ,आरोग्य कर्मचारी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट श्री. डी.एम. मेश्राम, आरोग्य कर्मचारी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट,

भवन्स जी व्ही एम हिंगणघाट येथील शिक्षक श्री. स्वप्निल आगाशे ,(क्रीडा शिक्षक), श्री.सागर बादलवार (संगणक शिक्षक) , शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंदानी तसेच सेंट जॉन कॉन्व्हेंट श्री श्री शेगोकार सर, महेश ज्ञानपीठ विद्यालय येथील श्री.बागडे सर यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments