Type Here to Get Search Results !

१२ वाजले तरी एकही अधिकारी हजर नाही..

               

    वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख  🗞️

               


महत्वाची सुचना:- तलाठी कार्यालय खरांगणा चे कोतवाल कार्यालय करण्यात आले आहे. तरी फक्त कोतवालांना भेट देण्यासाठी हे कार्यालय नेहमी तुमच्या सेवेशी...


खरांगणा (मोरांगणा):- तलाठी कार्यालय खरांगणा चे मंडळ अधिकारी सहीत तलाठी वेळेचे पालन न करता घरी बसून सुस्त. खरांगणा मंडळात एकुण सहा साझा असुन पाच तलाठी नेमले आहेत. त्यानुसार सहा साझा साठी प्रत्येकी एक असे सहा कोतवाल नेमले आहेत. पण तलाठी कार्यालयात फक्त कोतवाल हजर असतात. पण जिम्मेदार अधिकारी एकही नसतो. कधी १२ वाजता येतात, तर कधी येत सुद्धा नाही. आणि फोन केला तर आमची वर्धा येथे ड्युटी लागली तर कोणी मिटींग आहे असे सांगून नेहमी टाळाटाळ करतात. शेड्युल मागितला तर शेड्युल नाही आहे म्हणून फेटाळून लावते. हालचाल रजिस्टर तर आहेच नाही. इतकेच नव्हे तर कोतवालांना सुध्दा यांच्या शेड्युल बद्दल काही सांगत नाही. कोतवालांना जर सुचना दिली तर ते आपल्या गावातील वास्टअप ग्रुप वर माहिती टाकू शकतो. 


वातावरण व कृषी कंपन्यांच्या धोकाधडीमुळे व सरकारच्या या नियमांमुळे आधीच शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यातल्या त्यात आधी गावांमध्ये तलाठी कार्यालय असायचं पण या अशा कामचोर अधिकार्यांनी गावात नेटवर्क नसते, असे सांगून गावातील तलाठी कार्यालये बंद करून त्यांच्या सोयीचे होईल, अशा पद्धतीने एका ठिकाणी बसून डबा पार्टी करून घरी जाने असे कर्तव्य निवडले. शेतकरी वाहनांच्या उपलब्धते नुकसार खेड्यातून कार्यालयात येतो, पण अधिकारी नाही असे सांगून नेहमी त्याला फेटाळून लावतात. शेतकऱ्यांचे जे काम एका वेळी व्हायला हवे ते होत नाही. त्यात त्या शेतकरयांचा वेळ व मजुरी हे व्यर्थ जाते. याकरिता शासनाने लक्ष द्यावे. व कर्तव्यदक्ष अधिकारी नेमण्यात यावे.


तसेच शासन कार्यालयासाठी व त्याच्या सौंदर्यीकरणासाठी खर्च करते. आणि कार्यालयाच्या परिसरात झाडे लावते. व त्याची निगा राखणे हे तेथील शिपाई कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. सहा शिपाई एक एक दिवस वाटून घेऊन सहा दिवस त्या झाडांना पाणी देणे व परीसर स्वच्छ ठेवणे करू शकतो पण कार्यालय आहे जंगल कळतंच नाही. झाडे लावा झाडे जगवा सरकारची ही संकल्पना सरकारी लोकांनीच उध्वस्त केली आहे. अरे शेतकरयांच्या शेतात जाऊन जेव्हा त्याने जगवलेल्या आंब्याच्या, पेरूच्या, लिंबाच्या आदी झाडांखाली जेव्हा तुम्ही बसता आणि म्हणता की तुमच्या शेतात खुपचं छान वाटते हो, त्या वेळी तुम्हाला लाज वाटावी.. 

पगार घेऊन कर्तव्याशी धोका करता आणि आमचा शेतकरी निस्वार्थ झाडे जगवतो.

Post a Comment

0 Comments