प्रसाद दादाचे मनोगत..जिल्हा परिषद निवडणूक.
धनाजी शेळके, पेण, 🗞️
गेले बारा दिवस प्रत्येक घराचा उंबरठा ओलांडत हसमुखाने आपले चिन्ह सांगत थोरा मोठयानच्या पायाला हात लावून आशीर्वाद मागत घराघरात पोहोचलेली उमेदवार पल्लवी प्रसाद दादा भोईर वहिनी यांच्या विजयाचा सेलिब्रेशन संपता संपत नाही. झालेली निवड ही आम्ही प्रामाणिकपणे जबाबदारी समजतो...परंतु मोठ मोठ्या ताकदीविरुद्ध पैसेवाल्याविरुद्धची ही लढाई तब्बल 4073 इतक्या भरघोस मताने जिंकली त्याचा सर्वच कार्यकर्त्यांना जिवलगांना झालेला आनंदही साजरा केलाच पाहिजेत. दादा म्हणतात फार कमी लोकांच्या नशिबी हे जनतेच हे निखल प्रेम वाट्याला येतं.आम्ही भाग्यवंत...गावा गावातल्या तरुण मुला-मुलींनी अगदी आठवडा आठवडा कामाला दांड्या मारल्या सुट्ट्या काढल्या दिवस रात्र प्रचार प्रचंड मेहनत घेतली त्यामुळे सेलिब्रेशन तर तितकाच उत्साहीत होणार अवघ्या बारा दिवसात हजारो घरांमध्ये स्वतः जाऊन प्रचार पत्रिका देणे प्रत्येकाच्या आपुलकीने संवाद साधनं सुखदुःखाची विचारपूस करणारा हा प्रचार नव्हता हा लोकांची जोडलेला जिव्हाळ्याचा प्रवास होता. उमेदवार स्वतः घराघरात गेली हेच निवडणुकीच वैशिष्ट्य ठरल आणि शिव कासू विभागाने नव्या नेतृत्वावर विश्वासाची मोहर उमटवली..पल्लवी प्रसाद दादा भोईर यांच्या रूपाने या विभागाची चेतना संवेदना आणि स्वाभिमान जागा झाला..सर्वसामान्य घरातून असलेली उच्चशिक्षित महिला प्रस्थापितांना धक्का देऊ शकते या निवडणुकीने ठामपणे सिद्ध केले या खडतर मतदार संघात मिळालेला मोठा विजय प्रसाद दादा भोईर यांच्या शिस्तबद्ध नियोजनाचा योग्य रणनीतीचा आणि प्रभावी अंमलबजावणीचा परिणाम आहे.. आज जनता सुज्ञ झालीआहे पैशाच्या बलावर नव्हे तर कर्तुत्वाच्या बलावर विजय मिळतो.. प्रसाद दादांनी नेतृत्व कर्तृत्व आणि लोकांशी जुळलेली नाळ याचाही या विजयात मोठा वाटा आहे... दादांसोबत खांद्याला खांदा लावून उभी राहिलेल्या वहिनींच्या अपार मेहनतीला हा विजय समर्पित आहे
.प्रसाद दादाचे मनोगत..जिल्हा परिषद निवडणूक.
February 11, 2026
0
Tags

Post a Comment
0 Comments