सिन्नर प्रतिनिधी पवार प्रविण
विषय-: मनेगाव सहित बावीस गावे पाणीपुरवठा योजना सुरळीत चालू होणे बाबत...
माननीय महोदय, तहसीलदार साहेब गेल्या पाच ते सहा महिन्यापासून अनेक वेळा निवेदन व मीटिंग घेऊनही लासलगाव विंचूर दळवी घोटी रस्त्याच्या चालू कामामुळे मनेगाव सहित 22 गावे पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन दुरुस्ती न झाल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला असून मनेगाव, धोंडवीरनगर, रामनगर, पाटोळे, दापूर, दोडी ,गोंदे, भोकनी अजून आठ दिवसात जवळजवळ योजनेतील सर्वच गावांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थितीत होणार आहे. सद्यच्या परिस्थितीत काही गावांना 200 लिटरच्या पिण्याच्या पाण्याच्या एक ड्रम पाण्यासाठी 60 रुपये प्रमाणे पाणी विकत घ्यावे लागते आहे. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन नादुरुस्त झाल्यामुळे गावांना पाणी येत नसल्याकारणाने एम.एस.ई.बी. बोर्ड ने वीज कनेक्शन कट केले असून सदर कनेक्शन चालू करण्यासाठी ही खूप तांत्रिक अडचणी येत आहे. तसेच इतर ठिकाणीही पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे. 22 गावे पाणीपुरवठा योजनेत असल्याकारणाने पंचायत समितीतून पिण्याच्या पाण्याचे टँकरही गावकऱ्यांना उपलब्ध होऊ शकत नाही. महाराष्ट्र शासनाने 50 टक्के अनुदान हि बंद केल्याने शासनाने पंधरा वित्त आयोगातून एमएसईबी चे बिल भरण्यास सांगितलेले आहे. सदर पंधरा वित्त आयोगाचा निधी हा गावातील छोट्या-मोठ्या विकास कामांसाठी असतो .त्यामुळे सर्वच ग्रामपंचायती 15 वित्त आयोगाचा निधी देण्यास टाळाटाळ करतात. कोणत्याही परिस्थितीत सदर योजना चालूच झाली पाहिजेत यासाठी आपण ठोस पावले उचलावी., अन्यथा येत्या आठ दिवसात 22 गावातील महिला व पुरुषवर्ग मोठ्या प्रमाणात रस्ता रोक केला जाईल. सदर ठेकेदाराने मनेगावसह 22 गावे पाणीपुरवठा योजनेचे पाईपलाईन व महावितरणाचे ५ महिन्याचे लाईट बिल भरून द्यावे.
तहसीलदार साहेब कृपया आपण स्वत: व्यक्तिशः या प्रकरणात लक्ष घालून 22 गावे पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर चालू करावी किंवा सदर दोषी असलेल्या या कॉन्टॅक्टर वर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी व तुम्हाला विनंती.
प्रत रवाना
१) श्री. मा. आयुष प्रसाद (भा. प्र. से.)जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी, नाशिक.
२) श्री. मा. गुलाबराव रघुनाथराव पाटील (माननीय मंत्री ,पाणी पुरवठा व स्वच्छता).
३) श्री. मा. राजाभाऊ वाजे खासदार नाशिक जिल्हा.
४) श्री. मा. मंत्री आमदार माणिकराव कोकाटे साहेब सिन्नर विधानसभा.
५) श्री. मा. बीडिओ साहेब, सिन्नर पंचायत समिती.



Post a Comment
0 Comments