वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख
"तुम्ही पृथ्वीवरील जीवांवर दया करा, म्हणजे परमेश्वर तुमच्यावर दया करेल"
समुद्रपूर (वर्धा): रस्त्यावरील अपघातात निष्पाप वन्यजीव आणि पक्षांचा बळी जाण्याच्या घटना थांबवण्यासाठी मोहम्मद शकील सर यांच्या वतीने 'आम्हाला पण जगू द्या' ही व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
या मोहिमेचा प्रचार आता केवळ रस्त्यापुरता मर्यादित न राहता शाळा, महाविद्यालये आणि गावागावात पोहोचला आहे.
शकील सर, एकलव्य अ.आ. आश्रम शाळा, वायगाव (गोंड) यांनी अलीकडेच श्री गीद्देवार सर पंचायत समिती समुद्रपूर, विकास विद्यालय वायगाव (गोंड ), विद्या विकास महाविद्यालय,समुद्रपूर आणि राजीव गांधी विद्यालय वायगाव (हळदया), येथील शिक्षकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी मोहिमेचा उद्देश सांगून शिक्षकांचे सहकार्य मागितले. तसेच, आश्रम शाळा वायगाव (गोंड) येथील कु. वर्षा चापके, रौशन शेख, चंद्रशेखर पांगुळ यांनीही या मोहिमेला सहयोग दिला. तसेच, आश्रम शाळा वायगाव (गोंड) येथील विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षिततेबद्दल मार्गदर्शन करत मुक्या प्राण्यांप्रति संवेदनशील राहण्याचे आवाहन केले. या मोहिमेला शाळेच्या सचिव श्रीमती अपर्णा सुनिल अनासाने अध्यक्ष श्री. प्रणित अनासाने, मुख्याध्यापिका सौ वीणा नरसापूरकर यांनीही कौतुक केलं आहे
पॉमप्लेट आणि बॅनर्सने वेधले लक्ष
या मोहिमेचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी गावात ठिकठिकाणी पॉमप्लेटआणि बॅनर्स लावण्यात आले आहेत.
यामध्ये प्रामुख्याने:
पानटपरी, दुकाने आणि शाळा व महाविद्यालय परिसराचा समावेश आहे.
वाहन चालकांचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्याच्या बाजुला झाडांवरही फलक लावण्यात आले आहेत.
'प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे'
पॉमप्लेट आणि बॅनर्स च्या माध्यमातून शकील सरांनी अत्यंत मार्मिक संदेश दिला आहे की, पर्यावरण संतुलन राखण्या करीत निसर्गातील सर्वच पशु पक्ष्यांचे अस्तित्व कमी अधिक प्रमाणात महत्त्वाचे आहे.अनेकदा मानवी चुकामुळे, हलगर्जीपणा मूळे छोट्या पक्षु पक्ष्यांना नाहक जिवास मुकावे लागते.आपल्या वाहतुकीच्या रस्त्यावर आजवर कितीतरी निष्पाप जीव आपल्या नकळत पणे होणाऱ्या चुकीने मृत्युमुखी पडले आहेत.
हे थांबवण्यासाठी:
सावधपणे गाडी चालवा
आणि निसर्ग सुरक्षित ठेवा
हेच सामाजिक जनजागृतीच्या मोहिमेचे लक्ष आहे.या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि प्राण्यांच्या सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण होत आहे.
आम्हाला पण जगू द्या” मोहिमेला शाळा आणि शिक्षकांचा मोठा पाठिंबा
February 12, 2026
0
Tags

Post a Comment
0 Comments