गिरड प्रतिनिधी अब्दुल कदिरदिनांक: 11 फेब्रुवारी 2026आष्टी/लहान आर्वीरस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला असो वा मृत्यूचं तांडव समोर दिसत असो, जिथे सामान्य माणसाची हिंमत डगमगते आणि दुनिया मागे सरकते, तिथे एक नाव वादळासारखं धावून येतं, ते म्हणजे प्रितम गायकी! काल लहान आर्वी ते आष्टी रोडवर झालेल्या भीषण अपघातात प्रितम यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की, "माणुसकी" ही केवळ शब्दांत नाही, तर त्यांच्या रक्तात आहे.काल सायंकाळी जेव्हा रस्ता अपघाताने थरारला, तेव्हा प्रितम यांचे मित्र अमर जाणे यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तात्काळ प्रितम यांना कॉल केला. माहिती मिळताच, घड्याळाच्या काट्याकडे न पाहता आणि एका सेकंदाचाही विलंब न लावता प्रितम गायकी यांनी घटनास्थळी झेप घेतली.प्रितम भाऊंची 'सुपरफास्ट' निर्णयक्षमता अन् धाडस!घटनास्थळावर जखमींची अवस्था पाहून प्रितम यांनी क्षणाचाही विचार न करता वेगाने चक्रे फिरवली. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी त्यांनी दोन प्रकारे व्यवस्था केलीएका अपघातग्रस्ताला तातडीने एका चारचाकी गाडीत बसवून तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले.आणि ज्या दुसऱ्या जखमीला अत्यंत गंभीर मार लागला होता, त्याला रुग्णवाहिकेमध्ये (Ambulance) घेऊन प्रितम गायकी स्वतः सोबत गेले. स्वतः जातीने हजर राहून त्यांनी त्या जखमीला दवाखान्यात दाखल केले.अपघातानंतरचा पहिला तास (Golden Hour) हा जखमींसाठी जीवन-मरणाचा प्रश्न असतो. प्रितम यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे जखमींना अगदी वेळेत उपचार मिळाले. त्यांनी केवळ रुग्णवाहिका बोलावली नाही, तर पोलीस प्रशासन आणि रुग्णालयाशी समन्वय साधून उपचारांची प्रक्रिया वेगवान केली.प्रितम गायकी यांनी आतापर्यंत अनेकदा अशाच प्रकारे शेकडो अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. जिथे इतर लोक मोबाईलवर शूटिंग करण्यात व्यस्त असतात, तिथे प्रितम भाऊ जखमींचे प्राण वाचवण्यात व्यस्त असतात. अपघात कोणताही असो, "प्रितम भाऊ तिथे मदतीला येणारच," हा विश्वास आता जनमानसात निर्माण झाला आहे.अमर जाणे यांनी वेळेत दिलेली माहिती आणि प्रितम यांनी दाखवलेलं अचाट धाडस, यामुळे काल अपघात ग्रस्तांना तत्काळ मदत मिळाली. या दोघांच्याही जागरूकतेमुळे एका कुटुंबाचा आधार वाचला आहे. त्यांच्या या कार्याला आज संपूर्ण तालुका मानाचा मुजरा करत आहे.
माणुसकीचा 'रखवालदार'! जिथे दुनिया मागे हटते, तिथे प्रितम गायकी छातीठोकपणे उभा राहतो!
February 13, 2026
0
Tags

Post a Comment
0 Comments