Type Here to Get Search Results !

मनेगाव विद्यालयात शिव जन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

             सिन्नर प्रतिनिधी पवार प्रविण

मनेगाव विद्यालयात शिव जन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित नूतन जवाहर विद्यालय मनेगाव विद्यालयात अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.राजेंद्र गांगुर्डे  यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यालयात संपन्न झालेल्या भव्य दिव्य अशा


 कार्यक्रम प्रसंगी  विद्यार्थ्यांनी नृत्य नाटीकेचे सादरीकरण करून बलाढ्य शक्तीवर महाराजांनी गनिमी काव्याने कसा विजय मिळवला अशा विविध ऐतिहासिक प्रसंगांचे तसेच शिवराज्याभिषेक सोहळा अशा अनेक शिवकालीन प्रसंगाचे या नाटिके द्वारे सादरीकरण केले. विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचे माहिती सांगितली. तसेच  इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावरती नृत्य करून संपूर्ण मनेगाव ग्रामस्थांची मने जिंकली.

 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री.खैरनार सर यांनी  केले. विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री. शिंदे एस.व्ही.यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती वृषाली खताळ यांनी केले.कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments