Type Here to Get Search Results !

उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट कार्यालयातील कर्मचारी यांची रेती माफिया विरुद्ध केलेली कारवाई*

 *

उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट कार्यालयातील कर्मचारी यांची रेती माफिया विरुद्ध केलेली कारवाई*

      


       दि 20-02-2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या कार्यालयातील  अमलदार यांना गुप्त बातमीदाराच्या मिळालेल्या माहिती प्रमाणे आरोपी सुरज गजानन देवाडे, रा.सावली (वाघ), ता.हिंगणघाट,जि. वर्धा हा त्याच्या ताब्यातील लाल रंगाचा ट्रॅक्टर  क्रमांक MH 32 AH 6883 ने मौजा सावली(वाघ) ते मौजा कडाजना येथे काळी रेती चोरी करून वाहतूक करीत आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने, मौजा कुकाबड्डी शिवार येथे नाकेबंदी दरम्यान आरोपी हा त्याचा ताब्यातील लाल रंगाचे ट्रॅक्टर क्रमांक MH 32 AH 6883 व एक ब्रास  काडी रेती (गौण खनिज) बिना रॉयल्टी वाहतूक करताना रंगेहाथ मिळून आल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून ट्रॅक्टर क्रमांक MH 32 AH 6883 व एक ब्रास  काळी रेती (गौन खनिज ) असा जु कि 8,08,000/- रु चा माल मिळून आल्याने , पो स्टे. हिंगणघाट येथे परत येवुन आरोपी विरूध्द गुन्हा नोंद केला ......           

          सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल सा. मा.अपर पोलीस अधिक्षक श्री सदाशिव वाघमारे सा.मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट श्री.  सुशीलकुमार नायक साहेब  यांचे   निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, हिंगणघाट यांचे कार्यालयातील पोलीस हवालदार राहुल साठे, पोलीस हवालदार उमेश लडके, पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलीस हवालदार रवींद्र घाटुर्ले ,पोलीस  हवालदार सतीश घवघवे यांनी केली.

Post a Comment

0 Comments