पोलीस स्टेशन गिरड येथे शांतता समितीची बैठक पार पडली
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख
पोलीस स्टेशन गिरड अंतर्गत आज दिनांक 19/03/2026 रोजी आगामी येणारे सण उत्सव गुढीपाडवा रमजान ईद श्रीराम नवमी निमित्त पोलीस स्टेशनला शांतता समितीची बैठक घेण्यात आली पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या आदेशाप्रमाणे सूचनांची अंमलबजावणी होण्याबाबत त्यांना सूचित करण्यात आले तसेच संपूर्ण सण उत्सव कार्यक्रम शांततेत पार पाडावे असे यावेळी सगळ्यांना सुचविण्यात आले यावेळी गिरड पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय विकास जी गायकवाड साहेब गोमेद पाटील साहेब शांतता समितीचे सदस्य अब्दुल रहीम गुड्डू भाई सलीम पटेल ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष अब्दुल कदिर उपस्थित होते

Post a Comment
0 Comments