हिंगणघाट पालिकेचा भोंगळ कारभार: लाखांचा टॅक्स भरूनही जनतेच्या पदरी 'फाटके डबे'!
स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा; कचरा संकलनासाठी भंगार गाड्यांचा वापर
हिंगणघाट:
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेखकेंद्र सरकारच्या 'स्वच्छ भारत' अभियानांतर्गत शहर चकाचक करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या हिंगणघाट नगरपरिषदेचा कारभार सध्या चव्हाट्यावर आला आहे. जनतेकडून दरवर्षी लाखो रुपयांची कर वसुली केली जाते, मात्र सुविधांच्या नावावर प्रशासनाकडून केवळ 'पांढरा हत्ती' पोसला जात असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांची झालेली दुरावस्था पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
खाजगी कंपनीचे फाटके पत्रे
हिंगणघाट नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट नागपूर येथील व्ही.एच.पी.एल (VHPL) कंपनीला दिले आहे. या कामासाठी शासनाचा आणि जनतेचा मोठा पैसा खर्च केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात सेवा देताना या कंपनीकडून अत्यंत निकृष्ट दर्जाच्या गाड्या वापरल्या जात आहेत. कचरा संकलनासाठी येणाऱ्या गाड्यांचे पत्रे जागोजागी फाटलेले असून, त्यातून कचरा आणि सांडपाणी रस्त्यावर सांडत आहे.
प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष
सामान्य जनतेला स्वच्छतेचे आणि नियमांचे धडे देणारे नगरपरिषद प्रशासन स्वतःच्या कंत्राटदाराच्या मनमानीकडे डोळेझाक करत आहे. "जनतेला नियमांचा पाठ सांगणाऱ्या प्रशासनाने स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे का?" असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी लाखो रुपये खर्च होत असताना, या भंगार गाड्यांमुळे शहराच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नागरिकांच्या मागण्या:
गाड्यांची तातडीने दुरुस्ती: कचरा संकलनासाठी सुस्थितीतील गाड्या उपलब्ध करून द्याव्यात.
कंत्राटदारावर कारवाई: कामात हलगर्जीपणा करणाऱ्या व्ही.एच.पी.एल कंपनीवर दंड �

Post a Comment
0 Comments