Type Here to Get Search Results !

हिंगनघाट:- नगरपालिकेच्या प्रभाग न. ९ मधे गंदगीचा ढीग साचल्याने स्थानिक नागरिक हैराण झाले

 

हिंगनघाट:- नगरपालिकेच्या प्रभाग न. ९ मधे गंदगीचा ढीग साचल्याने स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत





                   वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख

रस्त्याकडेला, उघड्या जागी आणि गटारांमध्ये कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डास-माश्यांचा उपद्रव वाढला असून, आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.

नागरिक म्हणतात, “दररोज कचरा संकलन होत नाही. ठेकेदारांच्या गाड्या वेळेवर येत नाहीत. नगरसेवक असून पन दुर्लक्ष करीत आहे आणी परिणामी रस्ते व फुटपाथ कचऱ्याने भरलेले आहेत. मुलांना खेळायला जागा नाही आणि आजारी पडण्याचा धोका वाढला आहे.”

नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत, पण अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. काही भागांत कचरा जाळण्याच्या घटनाही घडल्या आहेत, ज्यामुळे प्रदूषण वाढले आहे.

हिंगनघाट नगरपालिका प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून नियमित कचरा संकलन, स्वच्छता मोहीम आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी गौतम वार्ड प्रभाग क्रमांक ९ चे नागरिक करत आहेत. स्वच्छ हिंगनघाट साठी सर्वांनी जबाबदारी घेण्याची गरज आहे. स्वच्छता ही आपली सर्वांची जबाबदारी आहे! 🧹

Post a Comment

0 Comments