Type Here to Get Search Results !

हिंगणघाट येथील प्राणघातक हल्ल्यातील आरोपीला वाशिममधून बेड्या; गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कारवाई ​

 

हिंगणघाट येथील प्राणघातक हल्ल्यातील आरोपीला वाशिममधून बेड्या; गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कारवाई

       वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख

आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत झालेल्या वादातून कटरने वार करून फिर्यादीला गंभीर जखमी करणाऱ्या फरार आरोपीला हिंगणघाट पोलिसांनी वाशिम जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. सोन्यालसिंग ऊर्फ सोनीहालसिंग समीर सिंग भादा (२८, रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

​नेमकी घटना काय?

​दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास हिंगणघाट येथील आंबेडकर चौकात जयंतीची रॅली सुरू होती. या रॅलीमध्ये नाचत असताना फिर्यादी मिलिंद ऊर्फ गुठली दीक्षित आणि आरोपी सोनीहालसिंग भादा यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने रागाच्या भरात कटरने मिलिंद यांच्या पोटावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

​असा लागला छडा

​घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथक (DB) त्याचा शोध घेत असताना, तो वाशिम जिल्ह्यात असल्याची गुप्त माहिती मिळाली.

​सपोनि पद्माकर मुंडे यांच्या नेतृत्वातील पथकाने तांत्रिक बाबींच्या आधारे तपास चक्र फिरवले. आरोपी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड जवळील वडवी गावात लपून बसल्याची खात्री पटताच, पथकाने सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

​तपास पथकाची कामगिरी

​ही यशस्वी कारवाई वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, आणि पोलीस निरीक्षक अनिल राऊत �

Post a Comment

0 Comments