Type Here to Get Search Results !

वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गांजा तस्करी करणाऱ्या गुन्हेगाराला रंगेहाथ पकडले

 

वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गांजा तस्करी करणाऱ्या गुन्हेगाराला रंगेहाथ पकडले

             वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख

वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत दि. २४ एप्रिल २०२६ रोजी हिंगणघाट परिसरात सापळा रचून गांजाची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून १ लाख ५५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​सापळा रचून केली कारवाई

​मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगणघाट परिसरात गस्तीवर असताना मुखबिराकडून खात्रीशीर खबर मिळाली की, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर गांजाची तस्करी होणार आहे. या माहितीच्या आधारे मौजा रिमडोह शिवार, कोचर खरर्डा फॅक्ट्रीजवळ पोलिसांनी सापळा रचला. यावेळी एम.एच. ३२ ए.डब्लू. ४८७७ क्रमांकाच्या सुझुकि बर्गमॅन मोपेडवरून येणाऱ्या संशयिताला थांबवून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे अंमली पदार्थ मिळून आले.

​आरोपी आणि जप्त मुद्देमाल

​अटक आरोपी: अब्दुल रिजवान उर्फ टोनी अब्दुल रज्जाक शेख (वय ३० वर्ष, रा. संत कबीर वार्ड, हिंगणघाट).

​फरार/सहआरोपी: जावेद शेख (रा. ऑटोमॅटिक चौक, यशोधरा, नागपूर) - याने गांजा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

​जप्त मुद्देमाल: २ किलो २२८ ग्रॅम गांजा आणि सुझुकि मोपेड (एकूण किंमत १,५५,७०० रुपये).

​नागपूर कनेक्शन उघड

​पोलीस तपासात असे समोर आले आहे की, हा गांजा नागपूर येथील जावेद शेख याने पुरवला होता. हिंगणघाट पोलिसांनी या प्रकरणी एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यान्वये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

​या पथकाने बजावली कामगिरी:

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधी�

Post a Comment

0 Comments