जागतिक मलेरिया हिवताप दिन हिंगणघाट शहरात साजरा...
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेखआज दिनांक 25/04/2026 ला जागतिक हिवताप दिवस जिल्हा हिवताप अधिकारी वर्धा डॉ. नलिनी विखे ,
वैद्यकीय अधीक्षक , उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट डॉ. आशिष लांडे,
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ, प्रभाकर नाईक, यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला .
जागतिक हिवताप दिवस भारत विद्यालय हिंगणघाट येथे घेण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भट्टड सर, तालुका पर्यवेक्षक पुनम भुसारी ,
उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील मलेरिया विभागाचे आरोग्य निरीक्षक श्री उमेश मेश्राम, आरोग्य कर्मचारी असलम फारुकी, डाखराम मेश्राम,
अवैद्यकीय सहाय्यक प्रशांत जंगठे, व इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना श्री उमेश मेश्राम आरोग्य निरीक्षक यांनी मलेरिया बाबत सविस्तर माहिती दिली व लक्षणे सांगितले .
मलेरिया हा आजार प्लासमोडियम या परोपजीवी जंतू पासून होतो. हे जंतु ॲनफिलस डासापासून प्रसारित होतो.
मलेरिया लक्षणे :- -थंडी वाजून ताप येणे,
- ताप सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो
- नंतर घाम येऊन अंग गार पडते
- ताप आल्यानंतर डोके अतिशय दुखते
- बऱ्याच वेळा उलट्या होतात
- अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या दवाखान्यात जाऊन मलेरिया बाबत तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले .
तसेच आरोग्य कर्मचारी असलम फारुकी यांनी डास उत्पत्ती कशी होते त्यांचे जीवन चक्र ,घ्यावयाची काळजी व,मलेरिया विभागामार्फत राबविण्यात येणारे कार्यक्रम याबाबत सविस्तर माहिती दिली.
श्री .डाखराम मेश्राम आरोग्य कर्मचारी यांनी गप्पी मासे बाबत माहिती दिली लारवा व गप्पी मासे यांचे प्रदर्शन लावले.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांना वृंदांनी सहकार्य केले. शाळेतील सर्व विद्यार्थीनी मलेरिया बाबत माहिती जाणुन घेतली.
सोनल पातोंड, कोंडावार या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले


Post a Comment
0 Comments