पत्रकार भवनाबाबत नगर परिषदेत ठराव?; एकाच संस्थेला प्राधान्य दिल्याचा आरोप
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख
हिंगणघाट (प्रतिनिधी):
हिंगणघाट नगर परिषदेमध्ये “पत्रकार भवन” संदर्भात ठराव घेण्यात आल्याची माहिती समोर येत असून, या ठरावाद्वारे एकाच संस्थेला प्राधान्य देण्यात आल्याचा आरोप शहरातील पत्रकारांकडून करण्यात येत आहे.
“हिंगणघाट पत्रकार संघ” या संस्थेला पत्रकार भवनाचा ताबा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा असून, या पार्श्वभूमीवर इतर पत्रकारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित ठराव प्रक्रियेत सर्व पत्रकारांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचा आक्षेप घेतला जात आहे.
पत्रकार भवन ही सुविधा सार्वजनिक स्वरूपाची असून ती सर्व पत्रकारांसाठी समान हक्काने उपलब्ध असावी, अशी भूमिका पत्रकारांनी मांडली आहे. मात्र, एकतर्फी ठराव घेतल्याने पत्रकारांमध्ये मतभेद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी शहरातील विविध पत्रकार एकत्र येऊन संयुक्त भूमिका ठरविणार असून, लवकरच मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून ठरावाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Post a Comment
0 Comments