Type Here to Get Search Results !

अवैध दारू वाहतुकीवर आळा; LCB कडून मोठी कारवाई, दोन जण अटकेत

 

अवैध दारू वाहतुकीवर आळा; LCB कडून मोठी कारवाई, दोन जण अटकेत


                वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख

वर्धा : स्थानिक गुन्हे शाखा (LCB) वर्धा यांनी रामनगर हद्दीत धडक कारवाई करत अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली असून, चारचाकी वाहनासह देशी-विदेशी दारू असा एकूण 2 लाख 16 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. 20 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, नागठाणा येथील सुशांत खोब्रागडे हा आपल्या साथीदारासह अमरावती जिल्ह्यातून चारचाकी वाहनाद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा घेऊन वर्ध्याकडे येत आहे. या माहितीच्या आधारे रामनगर परिसरातील नागठाणा रोडवर नाकाबंदी करण्यात आली.

दरम्यान, संशयित मारुती अल्टो (क्रमांक MH 30 L 5890) वाहन थांबवून तपासणी केली असता, वाहनात देशी दारू व बिअरच्या एकूण 8 पेट्या आढळून आल्या. यामध्ये एकूण 2,16,800 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपी 1) सुशांत राजू खोब्रागडे (वय 25, रा. नागठाणा, वर्धा) व 2) अमोल लक्ष्मण माने (वय 27, रा. गौरक्षण वार्ड, वर्धा) यांच्याविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई वर्धा जिला पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राहुल ईटेकर तसेच पथकातील सचिन इंगोले, भूषण निघोट, प्रमोद पिसे, अमोल नगराळे, मंगेश चावरे, अरविंद इंगोले यांनी पार पाडली.

अवैध दारू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments