महाराष्ट्र दिनानिमित्त गरजूंना दुपट्टा व चप्पल चे वाटप
# नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने आयोजन
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट चे वतीने गरजू व निराधारांना दुपट्टा व चप्पल चे वितरण करण्यात आले.
दिवसेंदिवस उन्हाचा तडाका वाढतच आहे. यापासून बचाव करण्यासाठी नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने स्थानिक जलाराम मंदिर परिसरात गरजू, निराधार ,वृद्ध वर्गाला दुपट्टा व चप्पल चे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या सेवाभावी कार्यात नारायण सेवा मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष, महेश अग्रवाल , मनोज सिंघवी, पराग मुडे ,सुभाष ललवाणी, प्रा. किरण वैद्य ,लक्ष्मण डहाके, रामचंद्र खडगी, चंद्रकांत कामडी ,पुखराज राका, यशवंत गडवार , डॉ शरद मद्दलवार,रूपचंद हेमनानी ,चंद्रकांत रोहनकर, विजय मुथा, रवी दूशेट्टीवार, एडवोकेट विशाल खिवसरा, अमोल भुतडा, विजय गुप्ता ,प्रकाश जोशी, दामोदर चंदनखेडे, मनोज मेंद, शुभांगी वैद्य अलका रानपरा, नंदिनी जवादे आदी सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. शहर प्रतिनिधी


Post a Comment
0 Comments