Type Here to Get Search Results !

वर्धा जिल्ह्यात स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमात देऊरवाडा मॉडेल हायस्कूल प्रथम; गुणवंत विद्यार्थी व शाळांचा गौरव

 

वर्धा जिल्ह्यात स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमात देऊरवाडा मॉडेल हायस्कूल प्रथम; गुणवंत विद्यार्थी व शाळांचा गौरव


             वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख


वर्धा : स्टुडंट पोलीस कॅडेट (SPC) कार्यक्रम 2025-26 अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा १ मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे उत्साहात पार पडला. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते विविध शाळांना प्रमाणपत्र, गौरवचिन्ह व विद्यार्थ्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

यामध्ये आर्वी तालुक्यातील मॉडेल हायस्कूल, देऊरवाडा यांनी प्रथम क्रमांक पटकावत जिल्ह्यात मानाचा बहुमान मिळविला. म्युनिसिपल हायस्कूल, आर्वी यांना द्वितीय तर नेहरू विद्यालय, सिंधी रेल्वे (ता. सेलू) यांना तृतीय क्रमांक प्रदान करण्यात आला.

सदर शाळांनी स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत विविध सामाजिक, शिस्तबद्धता व जनजागृतीपर कार्यक्रम प्रभावीपणे राबविले होते. उत्कृष्ट कामगिरीबद्दल मॉडेल हायस्कूल देऊरवाडाचे विद्यार्थी हर्षद प्रमोद बोरवार व तन्मय अजय दाभाडे यांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.

तसेच म्युनिसिपल हायस्कूल आर्वीच्या कुमारी आदिती अरविंद अंगाईतकर, कुमारी श्रद्धा अनंतराव कळंबे तसेच नेहरू विद्यालय सिंधी रेल्वेचे सिद्धांत दिलीप उईके व ओम प्रवीण चोरे यांनाही मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, सामाजिक जबाबदारी व नेतृत्वगुण जोपासत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, सहाय्यक फौजदार रियाज खान, प्राचार्य प्रफुलकुमार ठाकरे, शिक्षिका स्मिता बिजवे, शिक्षक राजेंद्र बाविस्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments