लग्नघर फोडणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
हिंगणघाट पोलिसांची तत्पर कारवाई; सोन्या-चांदीसह मुद्देमाल जप्त
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेखहिंगणघाट : शहरातील माता मंदिर वॉर्ड परिसरात लग्नघरात चोरी करणाऱ्या आरोपीला हिंगणघाट पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व नगदी असा एकूण 23 हजार 65 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. 7 मे 2026 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी श्रीमती मंगला राजू नरड, रा. माता मंदिर वॉर्ड, हिंगणघाट यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या मुलाचे दि. 5 मे रोजी लग्न असल्याने घरात पाहुण्यांची गर्दी होती. रात्रीच्या वेळी घराचा समोरील दरवाजा उघडा ठेवून कुटुंबीय अंगणात झोपले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरातील पहिल्या खोलीतील कपाटाच्या ड्रॉवरमधील बॅगेत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व नगदी असा एकूण 33 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौशल्यपूर्ण तपास सुरू केला. तांत्रिक माहिती व पोलीसी कौशल्याच्या आधारे आरोपी यश विठ्ठल ठाकरे (वय 21), रा. संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली.
आरोपीकडून विवो कंपनीचा मोबाईल, नगदी रक्कम, सॅमसंग कंपनीचा मोबाईल तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 23 हजार 65 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ठाणेदार अनिल राऊत यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार नरेंद्र डहाके, प्रविण बोधाने, विकास अवचट, पोलीस नाईक नरेंद्र आरेकर, निलेशसिंग सूर्यवंशी, पोलीस शिपाई आकाश कांबळे, सागर काळे तसेच सायबर सेल वर्धा यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment
0 Comments