Type Here to Get Search Results !

वेळा येथे अवैध मोह दारू व्यवसाय उघड; आरोपीविरुद्ध गुन्हा

 वेळा येथे अवैध मोह दारू व्यवसाय उघड; आरोपीविरुद्ध गुन्हा

           
              वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख

हिंगणघाट : पोलीस स्टेशन हिंगणघाटच्या पथकाने मौजा वेळा शिवारात दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करत गावठी मोह दारू निर्मितीसाठी तयार करण्यात आलेले कच्चे रसायन जप्त केले. या प्रकरणी लीलाधर रामजी बोरकर, रा. वेळा ता. हिंगणघाट, जि. वर्धा याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दि. २४ मे २०२६ रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पथकातील पोलीस कर्मचारी प्रविण बोधाने, स्वप्नील जिवने, सागर सामृतवार व प्रमोद डडमल यांना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, मौजा वेळा शिवारातील झाडाझुडपांमध्ये दोन प्लास्टिक ड्रम ठेवून गावठी मोह दारू तयार करण्यासाठी कच्चा मोहा सडवा रसायन तयार करण्यात येत आहे.

माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांसमक्ष घटनास्थळी धाड टाकली. त्यावेळी आरोपी लीलाधर बोरकर हा दोन प्लास्टिक ड्रममध्ये मोह दारूसाठी कच्चे रसायन तयार करताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपीच्या ताब्यातून सुमारे १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल राउत यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.

Post a Comment

0 Comments