Type Here to Get Search Results !

हिंगणघाट भूषण पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा ५ जूनला* *#पत्रकार संघ हिंगणघाटच्या वतीने आयोजन*

 हिंगणघाट भूषण पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा ५ जूनला

पत्रकार संघ हिंगणघाटच्या वतीने आयोजन

                 वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया 


       *हिंगणघाट* : पत्रकार संघ हिंगणघाटच्या वतीने व बळीराजा बाजारच्या सौजन्याने हिंगणघाट भूषण पुरस्कार व तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन शुक्रवार, दि. ५ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्री आनंदधाम जैन कटारिया भवन, हिंगणघाट येथे करण्यात आले आहे.

       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे उपस्थित राहतील. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, तहसीलदार योगेश शिंदे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, ठाणेदार अनिल राऊत, बळीराजा बाजारचे संचालक राजु राठी तसेच श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष भागचंद ओस्तवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

       यावर्षीचा प्रतिष्ठेचा ‘हिंगणघाट भूषण पुरस्कार’ रुग्णसेवेत उल्लेखनीय व निःस्वार्थ कार्य करणारे गजानन उर्फ गजू लक्ष्मणराव कुबडे (रुग्णमित्र, हिंगणघाट) यांना प्रदान करण्यात येणार आहे. गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळोवेळी मदतीचा हात देत त्यांनी मानवतेचा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे. त्यांच्या या समर्पित सेवाभावाचा गौरव या पुरस्काराद्वारे करण्यात येणार आहे.

       तसेच दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य संपादन करून तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास नागरिक, पालक, विद्यार्थी व सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन पत्रकार संघ हिंगणघाटचे अध्यक्ष प्रा. किरण वैद्य, सचिव राजेश अ. कोचर व उपाध्यक्ष मुकेश चौधरी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments