Type Here to Get Search Results !

मारवाडी युवा मंचाच्या राष्ट्रीय पुरस्काराने अर्पणा मरोठी यांचा गौरव

 

मारवाडी युवा मंचाच्या राष्ट्रीय पुरस्काराने अर्पणा मरोठी यांचा गौरव


वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया

महानगरातील युवा कार्यकर्त्या अर्पणा मरोठी यांना अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाच्या वतीने आयोजित प्रांतीय व राष्ट्रीय संघटनात्मक कार्यशाळा "उड्डाण-26" मध्ये उत्कृष्ट सेवा, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठ कार्यशैलीबद्दल राष्ट्रीय स्तरावरील सन्मानाने गौरविण्यात आले.


अर्पणा मरोठी गेल्या 16 वर्षांपासून मारवाडी युवा मंचाशी संलग्न आहेत. त्या हिंगणघाट शाखेच्या संस्थापक सदस्य असून सध्या झोन-5 च्या प्रांतीय सहायक मंत्री म्हणून सक्रियपणे कार्यरत आहेत.


मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय कार्यशाळेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.


यावेळी मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश जैन, मार्गदर्शक व माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, राष्ट्रीय कोषाध्यक्ष राहुल अग्रवाल, राष्ट्रीय उपाध्यक्ष (झोन-5) साकेत रिटोलिया, प्रांतीय अध्यक्षा अमृता भूतडा, राष्ट्रीय सहायक मंत्री प्रकाश बिंदल यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


या सन्मानाबद्दल अर्पणा मरोठी यांनी आपले मार्गदर्शक रोहित रूंगटा (अकोला), मारवाडी युवा मंच, एलिट लेडीज विंग, हिंगणघाट शाखेचे सर्व सदस्य तसेच मारवाडी युवा मंच महाराष्ट्र झोन-5 विदर्भमधील सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले

हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक प्रयत्नांचा नसून संपूर्ण संघाच्या सामूहिक सहकार्य, विश्वास आणि समर्पणाचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यातही समाजसेवा आणि संघटनात्मक कार्यात सातत्याने सक्रिय योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 

Post a Comment

0 Comments