Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ पत्रकार अब्बास खान गैरवर्तन प्रकरणी ठाणेदार अनिल राऊत यांच्या चौकशीची मागणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन_

 ज्येष्ठ पत्रकार अब्बास खान गैरवर्तन प्रकरणी ठाणेदार अनिल राऊत यांच्या चौकशीची मागणी

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन_

आज दिनांक.8/7/2026 ला 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया

हिंगणघाट पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री. अनिल राऊत यांनी ज्येष्ठ पत्रकार अब्बास खान यांच्याशी कथितरित्या गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी *हिंगणघाट तालुका डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने* जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक, वर्धा यांना सविस्तर निवेदन देऊन निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.


संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रविवार (दि. ५ जुलै २०२६) रोजी घडलेल्या या घटनेमुळे पत्रकारांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी अशा प्रकारचे अपमानास्पद वर्तन करणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे.


निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, हिंगणघाट शहरातील अनेक नागरिक, छोटे व्यावसायिक, चहाचे टपरी चालक, हातगाडीधारक आणि फुटपाथवरील विक्रेते यांच्याकडून ठाणेदार अनिल राऊत यांच्या कार्यपद्धतीबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत. किरकोळ व्यावसायिकांना विनाकारण त्रास देणे, धाकदपटशा दाखविणे तसेच सामान्य नागरिकांशी उद्धट भाषेत वागणे, अशा स्वरूपाचे आरोपही निवेदनात करण्यात आले आहेत.


काही नागरिकांनी "माझे कोणी काहीही करू शकत नाही, मी फक्त आमदारांनाच मानतो," अशा प्रकारची भाषा वापरून दडपशाहीचे वातावरण निर्माण केल्याची तक्रार केल्याचेही संघटनेने निवेदनात नमूद केले आहे. तसेच शहरातील काही कथित अवैध व्यवसायांशी संबंधित व्यक्तींशी जवळीक असल्याबाबत नागरिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चांचीही निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार अब्बास खान यांच्याशी झालेल्या कथित गैरवर्तनाची सखोल चौकशी, दोषी आढळल्यास शिस्तभंग व कायदेशीर कारवाई, नागरिक, पत्रकार व छोट्या व्यावसायिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी तसेच कथित संगनमताच्या आरोपांची निष्पक्ष तपासणी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशा प्रमुख मागण्या संघटनेने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केल्या आहेत.

निवेदन देतेवेळ

Post a Comment

0 Comments