दारूबंदीविरोधात हिंगणघाट पोलिसांची कारवाई
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख उर्फ राजा भैया
हिंगणघाट : नांदगाव चौक परिसरातून गावठी मोहा दारूची दुचाकीवरून वाहतूक करणाऱ्या एका इसमास हिंगणघाट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत बजाज पल्सर दुचाकीसह गावठी मोहा दारू असा एकूण ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पथकाने नांदगाव चौक, हिंगणघाट ते नांदगाव मार्गावर नाकाबंदी केली. यावेळी बजाज पल्सर क्रमांक एमएच ४९ एए ४८७६ वरून दारूची वाहतूक करणाऱ्या इसमास ताब्यात घेण्यात आले. चौकशी केली असता त्याने आपले नाव तेजस नारायण वाकडे (रा. काजी वॉर्ड, हिंगणघाट) असे सांगितले.
पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी जप्ती पंचनामा करून दुचाकी व गावठी मोहा दारू असा एकूण ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यानंतर आरोपीविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. कारवाईत पोलीस हवालदार चेतन पिसे, रवींद्र घाटुर्ले, उमेश लडके, सतीश घवघवे, अश्विन सुखदेवे आणि पोलीस शिपाई भारत बुटलेकर सहभागी होते.

Post a Comment
0 Comments