Type Here to Get Search Results !

लहान मुलांच्या हातात वाहन देऊ नका! अपघात टाळण्यासाठी वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे पालकांना आवाहन

 

लहान मुलांच्या हातात वाहन देऊ नका!

अपघात टाळण्यासाठी वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे पालकांना आवाहन


 विशेष प्रतिनिधी नईमुद्दीन शेख 

वर्धा : अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांच्या हातात कोणत्याही परिस्थितीत वाहन देऊ नये, असे आवाहन वर्धा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय घुले यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि अकॅडमीमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत १५ ऑक्टोबर रोजी वर्धा येथील परमवीर चक्र अब्दुल हमीद हायस्कूलमध्ये वाहतूक नियमांबाबत एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

आधुनिक युगात वाहतूक साधने जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. मात्र, लहान मुलांमध्ये वाहन चालविण्याची वाढती हौस आणि पालकांकडून अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देण्याचे प्रकार चिंताजनक आहेत. वाहतुकीचे नियम पाळणे, अपघात टाळणे आणि स्वतःसह इतरांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन त्यांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे प्रतिपादन वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक फौजदार रियाज खान यांनी केले.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आपत्कालीन मदतीसाठी ११२ पोलीस हेल्पलाइन, १०९८ चाइल्ड हेल्पलाइन, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि १०३३ महामार्गावरील मदत सेवा यांची माहिती देण्यात आली. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होऊ शकते, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद इजहार शेख होते. यावेळी शिक्षक साजिद शेख, सोफिया खातून यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेत सुमारे १०० ते १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आभार प्रदर्शन शेख सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments
ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 ratutogel ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88